-
राज्यात ओमायक्रोनचं संकट गडद होत असताना, बीडमध्ये मात्र भाजपा नेत्याच्या पुत्राच्या लग्नामध्ये करोनाचे नियमांचं उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं आहे.
-
करोनाच्या सर्व नियमांना झुगारून भाजपा नेत्याच्या मुलाचा शाही विवाह सोहळा बीड शहरात पार पडला आहे.
-
या विवाहाला खासदार, आमदारांसहीत माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती.
-
माजी आमदार बाजीराव जगताप यांचा मुलगा आणि भाजप नेते मोहन जगताप यांच्या बंधूच्या विवाह सोहळ्यात करोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले.
-
बीड शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये हा विवाह पार पडला.
-
ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेली नियमावलीची पायमल्ली लोकप्रतिनिधींकडून होत असल्याचं बीडमध्ये दिसून आले आहे.
-
या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नव्हते.
-
अनेक महिला या मास्क शिवायच लग्नच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांनी मास्क घातलं होतं.
-
स्टेजवरील अनेकांनी मास्क घातलं नव्हतं.
-
वाजत गाजत नवरदेवाची मिरवणूकही काढण्यात आली.
-
या मिरवणुकीमध्ये शेकडोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
-
अनेकजण अगदी गर्दी करुन रस्त्यावरच नाचाताना दिसले. या वेळी करोना नियमांअंतर्गत येणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवण्यात आला.
-
सांयकाळीही मोठ्या संख्येने या लग्नामध्ये उपस्थित असणारे लोक विवाहसोहळा आयोजित करण्यात आलेल्या लॉनबाहेर नाचत होते.
-
मोठ्या आवाजात डिजे लावून लग्नात आलेल्यांनी डान्स केल्याचं दिसून आलं.
-
या लग्नाचे व्हिडीओ आता व्हायरल झाले असून, नियम फक्त सर्वसामान्यांना आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
करोना..??? ते काय असतं?, असा प्रश्न तुम्हालाही BJP नेत्याच्या पुत्राच्या लग्नातील हे फोटो पाहून पडेल
बीडमधील या लग्नातील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नियम फक्त सामान्यांनाच असतात का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Web Title: Coronavirus guidelines violation in bjp ex mla bajirao jagtap son wedding scsg