• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. darvaza gas crater turkmenistan plan to close its gateway to hell scsg

Photos: …म्हणून अंतराळातूनही दिसणारा ‘नरकाचा दरवाजा’ कायमचा बंद होणार; जाणून घ्या थक्क करणारा इतिहास

मागील ५० वर्षांपासून म्हणजेच १९७१ पासून येथे आग धगधगत असून ही जागा वाळवंटामध्ये आहे.

January 10, 2022 18:09 IST
Follow Us
  • Darvaza gas crater Turkmenistan plan to close its Gateway to Hell
    1/24

    तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये, टीव्ही मालिकांमध्ये पाहिलं असेल की पृथ्वीबरोबरच स्वर्ग आणि नरकही अस्तित्वात आहे. स्वर्गामध्ये सर्वकाही छान गोष्टी असतात तर नरकामध्ये कायम आग धगधगत असते असं सांगितलं जातं. मात्र पृथ्वीवर खरोखरच नरकाचं द्वार म्हणावली जाणारी एक जागा आहे असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना?

  • 2/24

    पण ज्याप्रमाणे नरक या संकल्पनेनुसार ज्या ठिकाणी कायम आग धगधगत असते त्या नरकाचा दरवाजा म्हणून तुर्कमेनिस्तानमधील एक जागा जगप्रसिद्ध आहे.

  • 3/24

    मात्र लवकरच हा नरकाचा दरवाजा कायमचा बंद होणार आहे. म्हणजेच ही धगधगणारी आग विझवली जाणार आहे.

  • 4/24

    तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरबांगुली बर्दीमुहामेदोव यांनी नुकताच या नरकाच्या दरवाजासंदर्भात मोठा धक्कादायक निर्णय घेतलाय.

  • 5/24

    तुर्कमेनिस्तानमध्ये असणारी जी जागा नरकाचे द्वार म्हणून ओळखली जाते ती एक मोठ्या आकाराचा क्रेटर म्हणजेच खड्डा आहे.

  • 6/24

    हा खड्डा २३० फूट रुंद, २० मीटरहून अधिक खोल असून तो अगदी अंतराळामधूनही दिसतो.

  • 7/24

    या फोटोमध्ये खड्ड्याच्या बाजूने एक गाडी जाताना दिसतेय. त्यावरुन त्याच्या आकाराचा अंदाज बांधता येईल.

  • 8/24

    मागील ५० वर्षांपासून या खड्ड्यामध्ये आग धगधगत आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

  • 9/24

    मात्र आता राष्ट्रपती गुरबांगुली यांनी हा खड्डा बुजवण्याचे म्हणजेच ही आग कायमची शांत करण्याचे आदेश दिलेत.

  • 10/24

    गुलबांगुली यांनी आपल्या मंत्र्यांना आदेश दिले आहेत की त्यांनी जगातील या क्षेत्रामधील तज्ज्ञांना शोधून हा खड्डा कायमचा बुजवावा. पण हे असे आदेश देण्यामागे विशेष कारण आहे.

  • 11/24

    हा मोठ्या आकाराचा खड्डा म्हणजेच क्रेटर काराकुमच्या वाळवंटामध्ये आहे. ही जागा अश्गाबत शहरापासून १६० मैलांवर आहे.

  • 12/24

    मागील ५० वर्षांपासून सतत आग धगधगत असल्याने या खड्ड्याला ‘माऊथ ऑफ हेल’ किंवा ‘गेट ऑफ हेल’ असंही म्हटलं जातं.

  • 13/24

    बरं, ही नरकाचं द्वार म्हणून ओळखलं जाणारी आग कशी लागली याचा किस्साही मोठा रंगतदार असल्याचं सांगितलं जातं.

  • 14/24

    हा खड्डा आधीपासून येथे नव्हता. असा दावा केला जातो की शित युद्धाच्या कालावधीमध्ये सोव्हिएत संघाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मात्र याच संकटामधून या खड्ड्याची निर्मिती झाली.

  • 15/24

    सोव्हिएत संघाला १९७१ नैसर्गिक गॅस आणि तेलाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी जो खड्डा खोदण्यास सुरुवात केली त्यातूनच या खड्ड्याची निर्मिती झाली.

  • 16/24

    वैज्ञानिकांच्या मदतीने खोदकाम करुन खनिज तेल शोधण्यास सोव्हिएत संघाने सुरुवात केली. त्यांना नैसर्गिक गॅस तर मिळाला. मात्र ती जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात खचली की हा खड्डा तयार झाला.

  • 17/24

    या खड्ड्यामधून मिथेन वायूचा उत्सर्जन होत होतं. त्यामुळे येथील हवा प्रदुषित होऊ नये म्हणून हा वायू जाळून संपवण्याचा निर्णय घेत येथे आग लावण्यात आली.

  • 18/24

    गॅस संपल्यावर आग विझेल असा अंदाज होता. मात्र असं आजपर्यंत तरी झालेलं नाही.

  • 19/24

    त्यामुळेच तेव्हा लागलेली आग ही तेथून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनमुळे मागील ५० वर्षांहून अधिक काळापासून या खड्ड्यामध्ये आग धगधगत आहे.

  • 20/24

    मात्र या दाव्याचे ठोस असे पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. तरीही हा खड्डा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

  • 21/24

    मागील ५० वर्षांपासून दिवस रात्र येथे आग सतत धगधगत असून तिला विझवण्यात यापूर्वी अनेकदा अपयश आलं आहे.

  • 22/24

    त्यामुळेच आता राष्ट्रपतींनी वायू प्रदुषणाचा मुद्दा लक्षात घेत हा खड्डा कायमचा बुजवण्याचा आदेश दिलाय.

  • 23/24

    या परिसराच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला येथून निघणाऱ्या विषारी धुरामुळे धोका निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

  • 24/24

    आता खरोखरच राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे तज्ज्ञ मंडळी शोधून हा जगप्रसिद्ध खड्डा बुजवण्यात यश येतं की पुढील अनेक वर्ष हा असाच जळत राहतो, हे येणारा काळच सांगेल. मात्र या आदेशामुळे हा खड्डा पुन्हा चर्चेत आलाय हे मात्र नक्की. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार )

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Darvaza gas crater turkmenistan plan to close its gateway to hell scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.