Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. veermata jijabai bhosale udyan mumbai byculla zoo welcomes tiger cub penguin chick name ceremony photos sdn

कोणी ‘ऑस्कर’ घ्या कोणी ‘वीरा’ घ्या… राणीच्या बागेतील नव्या पाहुण्यांच्या ‘बारश्याचे’ खास फोटो

Updated: January 19, 2022 10:35 IST
Follow Us
  • Byculla Zoo Tiger Cub Penguin Chick Photos
    1/15

    मुंबई : ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’मध्ये तब्बल पंधरा वर्षांनी वाघाच्या बछड्यांचा जन्म झाला असून नवजात मादी पिल्लाचे नामकरण ‘वीरा’ असे करण्यात आले आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)

  • 2/15

    पाच महिन्यांपूर्वी जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ‘ऑस्कर’ असे ठेवण्यात आले आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)

  • महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी हा ‘बारसे सोहळा’ पार पडला. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
  • 3/15

    जिजामाता उद्यानात कित्येक वर्षे वाघ नव्हते. (फोटो : निर्मल हरिंद्रन, इंडियन एक्सप्रेस)

  • औरंगाबादच्या ‘सिद्धार्थ गार्डन प्राणिसंग्रहालया’तून १२ डिसेंबर २०२० रोजी वाघाची जोडी राणीच्या बागेत आणण्यात आली होती. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
  • त्यापैकी वाघाचे नाव शक्ती, तर वाघिणीचे करिश्मा असे ठेवण्यात आले होते. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
  • 4/15

    या जोडीने गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी एका मादी बछड्याला जन्म दिला. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)

  • 5/15

    या बछड्याचे नामकरण मंगळवारी ‘वीरा’ असे करण्यात आले. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)

  • 6/15

    करिश्मा वाघीण ही सध्या आपल्या बछड्याच्या संगोपनात गुंतली आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)

  • 7/15

    वीराला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून लवकरच लसीकरण केले जाणार आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)

  • 8/15

    प्राणिसंग्रहालयातील आकर्षण केंद्र असलेल्या पेंग्विन कक्षातील मोल्ट-फ्लिपर या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)

  • त्याचे नामकरणही मंगळवारी पार पडले. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
  • पिल्लाला ‘ऑस्कर’ हे नाव देण्यात आले आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
  • नामकरणाचा कार्यक्रम अगदी समारंभपूर्वक आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत पार पडला. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
  • प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुचवलेल्या नावांमधून ही दोन नावे निवडण्यात आली आहेत. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Veermata jijabai bhosale udyan mumbai byculla zoo welcomes tiger cub penguin chick name ceremony photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.