• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. youtube star aboflah raises 11 million usd by living in glass box in downtown dubai scsg

Photos: ८२ कोटी, Guinness Record, बुर्ज खलिफावर फोटो; १२ दिवसांत २१ वर्षीय तरुणाने एवढं सारं कमावलं

सोशल मीडियावरुनही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

January 21, 2022 17:45 IST
Follow Us
    • YouTube star AboFlah raises 11 million usd by living in glass box in Downtown Dubai
      दुबईमधील एका यूट्यूब स्टारने तब्बल १२ दिवस एका ग्लासच्या बॉक्समध्ये राहून लाइव्ह स्ट्रीमिंग केलं.
    • 1/18

      अबोफ्लाह असं या २१ वर्षीय युट्यूबरचं नावं असून तो सलग १२ दिवस लाइव्ह स्ट्रीमिंग करत होता.

    • 2/18

      जॉर्डन, लेबनॉन, इराकमध्ये आलेल्या थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणाऱ्या निर्वासितांना मदत करण्यासाठी अबोफ्लाहने हा असा वेगळा उपक्रम राबवला. यामध्ये अबोफ्लाहला त्याच्या टीमनेही मोठं सहकार्य केलं.

    • 3/18

      बुर्ज पार्कमध्ये तो १२ दिवस एका ग्लासच्या बॉक्समध्येच राहत होता.

    • 4/18

      यामधून त्याने १.१ कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८२ कोटींची देणगी गोळा केलीय.

    • 5/18

      अबोफ्लाहने यामधून जमवलेल्या या पैशांमधून निर्वासितांपैकी १ लाख १० हजार जणांना मदत केली जाणार आहे.

    • 6/18

      या पैशांमधून निर्वासितांसाठी जेवणाची आणि गरम कपड्यांची सोय केली जाणार आहे. तसेच सीरिया आणि इजिप्तमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांनाही यामधून मदत केली जाणार आहे.

    • 7/18

      अबोफ्लाह हा डाऊनटाउन दुबईमध्ये सात जानेवारीपासून १९ जानेवारीपर्यंत ग्लासच्या बॉक्समध्ये होता. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दीही झाली होती.

    • 8/18

      अबोफ्लाहचे अनेक चाहते रोज त्याला डाऊनटाउनमध्ये बघण्यासाठी मोठी गर्दी करायचे.

    • 9/18

      या आगळ्या वेगळ्या लाइव्ह स्ट्रीमिंगमधून एक कोटी डॉलर्स जमवण्याचं त्याचं लक्ष्य होतं.

    • 10/18

      हे लक्ष्य पूर्ण केल्यानंतर तो बुधवारी रात्री या काचेच्या बॉक्समधून बाहेर आला. त्याने केलेलं लाइव्ह स्ट्रीमिंग २.३७ कोटींहून अधिक फॉलोअर्सने पाहिलं.

    • 11/18

      तसेच जगभरातील एक लाख ५४ हजार ७८९ जणांनी या कामासाठी अबोफ्लाहला पैशांच्या रुपात देणगी दिली. तसेच त्याने एक गिनीज विक्रमही स्वत:च्या नावे करुन घेतलाय.

    • 12/18

      तसेच एवढ्या चांगल्या कामासाठी त्याने ही मोहीम राबवल्याने जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा या इमारतीवर त्याच्या या मोहिमेसंदर्भात त्याचं अभिनंदन करणारी रोषणाई करण्यात आलेली.

    • 13/18

      अबोफ्लाहचा फोटो बुर्ज खलिफावर झळकला.

    • 14/18

      अबोफ्लाहचं खरं नाव हसन सुलेमान असून त्याने, “सुरुवातीला असं वाटलं होतं की एक कोटी डॉलर्स जमवण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागेल. मात्र हे लक्ष्य १२ दिवसांमध्येच पूर्ण झाल्याचा आनंद आहे,” असं सांगितलं आहे.

    • 15/18

      ग्लासच्या बॉक्समध्ये राहून अबोफ्लाहने २६८ तास, १४ मिनिटं, २० सेकंद लाइव्ह स्ट्रीमिंग केलं.

    • 16/18

      हा एक गिनीज विक्रम आहे. त्यामुळे अबोफ्लाहचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. त्याने चीनच्या चोंगकिंग चांगन ऑटोमोबाइल कंपनी २५९ तास, ४६ मिनिटं आणि ४५ सेकंद लाइव्ह स्ट्रीम करण्याचा विक्रम मोडलाय.

    • 17/18

      सोशल मीडियावरुनही अबोफ्लाहवर कौतुकाचा वर्षाव होतोय. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Youtube star aboflah raises 11 million usd by living in glass box in downtown dubai scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.