• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ashneer grover namita thapar aman gupta anupam mittal know per episode fee of shark tank india judges scsg

Photos: Shark Tank मुळे ‘शार्क’च झालेत मालामाल; एका भागाची फी कितीय पाहिलं का?; अशनीर सर्वात महागडा

अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करता करता शार्कच मालामाल झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. ते एका भागासाठी किती पैसे घेतात पाहून थक्क व्हाल

February 4, 2022 19:24 IST
Follow Us
  • Ashneer Grover Namita Thapar Aman Gupta Anupam Mittal Know per episode fee of Shark Tank India judges
    1/36

    सध्या सोशल नेटवर्किंगपासून टीव्ही श्रेत्रामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा कार्यक्रम आहे, शार्क टँक इंडिया.

  • नवउद्योजकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारे शार्क म्हणजेच मोठे गुंतवणूकदार आणि या उद्योजकांच्या एकसो एक भन्नाट कल्पना असं या आगळ्यावेगळ्या रिअॅलिटी शोचं रुप आहे.
  • शार्क टँक इंडियामधील शार्क हे आज घरोघरी ओळखीचे चेहरे झाले आहेत.
  • विशेष म्हणजे अमन गुप्ता, पियुष बन्सल, अनुपम मित्तल, अशनीर ग्रोव्हर, नमिता थापर यासारखे चेहरे तर आता तरुणाईला लगेच ओळखू येऊ लागलेत.
  • 2/36

    या कार्यक्रमाने रोजच्या वापरातील कंपन्यांमधील हे बडे चेहरे कोण आहेत हे समोर आणलंय. विशेष म्हणजे लाखो रुपयांची गुंतवणूक करणारे हे लोक या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागासाठी लाखो रुपये मानधन स्वीकारतात. त्यावरच या गॅलरीमधून टाकलेली नजर.

  • 3/36

    विनिता सिंग शार्क टँक इंडियामधील आघाडीच्या महिला गुंतवणुकदारांपैकी एक आहे.

  • फार विचारपूर्वक पद्धतीने गुंतवणूक करणारी विनिता शुगर कॉसमॅटिक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आहे.
  • विनिताची एकूण संपत्ती ५९ कोटी इतकी आहे. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून विनिता पाच लाख रुपये घेते.
  • कार्यक्रमामध्ये फार उशीरा प्रवेश केलेल्या शार्क म्हणजेच गझल अलघ.
  • ममाअर्थ कंपनीची संस्थापक असणारी गझल या प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि कम्युनिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ आहे.
  • अल्पावधीमध्ये तिच्या कंपनीने अमाप प्रसिद्धी मिळवलीय.
  • 4/36

    गझलची एकूण संपत्ती १४८ कोटी इतकी आहे. ती प्रत्येक भागासाठी आठ लाखांचं मानधन घेते.

  • फार विचार करुन गुंतवणूक करणारा या कार्यक्रमामधील आणखीन एक शार्क म्हणजे अनुपम मित्तल.
  • पिपल ग्रुपचेा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असणारा अनुपम हा भारतीय ई कॉमर्स इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहेत.
  • शादी डॉट कॉम, मकान डॉट कॉमसारख्या साईट्समागील कनसेप्ट या अनुपमच्या सुपिक डोक्यातील आहे. त्याने ओलामध्येही एक कोटींची गुंतवणूक केलीय. या कंपनीच्या मालकीच्या दोन टक्के मालकी अनुपमची आहे.
  • 5/36

    अनुपमची एकूण संपत्ती १८५ कोटी इतकी आहे. एका कार्यक्रमासाठी अनुपम सात लाख रुपये मानधन घेतो.

  • नमिता थापर ही शार्क टँक इंडियामधील आघाडीच्या महिला गुंतवणूकदार आहे.
  • 6/36

    इमिक्युअर फार्मास्युटिकल्स या औषध विक्री क्षेत्रातील कंपनीच्या मुख्य निर्देशक असणारी नमिता थापर ही भारतीय उद्योगजगतामधील एका ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक आहे.

  • नमिता ही या कार्यक्रमामधील तिच्या कमेंट्समुळे आणि गुंतवणूक करण्याच्या पद्धतीमुळे सोशल मिडियावर चर्चेत आहे.
  • 7/36

    तिच्या कमेंटस आणि वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मिम्सचाही भाग झाली आहेत.

  • 8/36

    नमिता तिच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. नमिताची एकूण संपत्ती ६०० कोटींच्या आसपास आहे.

  • 9/36

    नमिता २००१ पासून अमेरिकेतील वेगवेगळ्या कंपन्यांशी संलग्न आहे. तिने फायनान्स आणि मार्केटींगमध्ये बरंच काम केलं आहे. ती शार्क टँकच्या एका भागासाठी आठ लाग रुपये मानधन घेते.

  • पियूष बन्सल ३६ वर्षांचा असून तो या कार्यक्रमामधील सारासार विचार करुन गुंतवणूक करणारा शार्क म्हणून ओळखला जातो.
  • लेन्सकार्ट या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे पियूष हा देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे.
  • लेन्सकार्टची २०१० साली स्थापना करण्याआधी पियूष हा २००७ साली अमेरिकेमध्ये मायक्रोसॉफ्टसाठी काम करायचा.
  • 10/36

    शार्क टँकमध्ये येणाऱ्या तंत्रज्ञानासंदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीला आपली पहिली पसंती असल्याचं पियूष सांगतो. पियूषची एकूण संपत्ती ही ६०० कोटी इतकी आहे. तो एका भागासाठी सात लाख रुपये मानधन घेतो.

  • अमन गुप्ता हा बोट या डिजीटल डिव्हाइज बनवणाऱ्या कंपनीचा सहसंस्थापक आहे.
  • 11/36

    हेडफोन्स आणि इयरफोन हे मुख्य प्रोडक्ट विकणारी अमनची कंपनी आज तरुणाईमध्ये फार लोकप्रिय आहे.

  • त्याचप्रमाणे अमनही आता या कार्यक्रमामुळे तरुणाईत लोकप्रिय झाला आहे.
  • अनेक स्टार्टअप सुरु करणाऱ्या अमननेच गुंतवणूक करावी असं सांगताना या कार्यक्रमात दिसतो. अमनची एकूण संपत्ती ७०० कोटी रुपये इतकी आहे. अमन एका कार्यक्रमासाठी नऊ लाख मानधन घेतो.
  • शार्क टँक इंडियामधील सर्वात फटकळ मतप्रदर्शन करणारा शार्क म्हणून अशनीरचं नाव घेतलं जातं.
  • आयआयटी दिल्ली, आयआयएम अमहदाबादचा माजी विद्यार्थी असणारा अशनीर हा भारत पे या कंपनीचा संस्थापक आणि मुख्य निर्देशक आहे.
  • अशनीरने कोटक बँकेचे उपाध्यक्ष पदही भूषवलं आहे. सध्या त्याच्या भारत पे कंपनीची सेवा १५० शहरांमध्ये ७५ लाख दुकानदार वापरतात.
  • 12/36

    वयाच्या ४० व्या वर्षी अशनीर हा देशातील सर्वात यशस्वी कोट्याधीशांपैकी एक होता.

  • 13/36

    अशनीरची एकूण संपत्ती ७०० कोटी इतकी आहे. तो शार्क टँकच्या एका कार्यक्रमासाठी दहा लाख मानधन घेतो.

  • 14/36

    एकंदरित ही यादी पाहिल्यास हे शार्क गुंतवणूक करण्याबरोबरच या कार्यक्रमामधून श्रीमंतही होत आहेत. (सर्व फोटो सोनी टीव्ही आणि शार्क टॅक इंडियावरुन तसेच सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ashneer grover namita thapar aman gupta anupam mittal know per episode fee of shark tank india judges scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.