-
भारताचा एक १९ वर्षीय नेमबाज सध्या चर्चेत आहे तो त्याच्या मैदानाबाहेरील एका ‘कार’नाम्यासाठी.
-
या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव अभिमाने उंचावलं आहे. तो ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धेत पदकही पटकावून आलाय.
-
शॉर्ट गन शूटर असणारा हा खेळाडू आशियाई स्तरावरील खेळांमध्ये एशियन चॅम्पियनही राहिला आहे.
-
विवान कपूर असं या नेमबाजाचं नाव असून तो चर्चेत येण्याचं कारणं ठरली त्याची गाडी.
आपल्या पाच कोटींच्या लॅम्बोर्गिनी गाडीमधून जाताना पोलिसांनी त्याला थांबवल्याचा आणि त्यानंतर थोडी बाचाबाची झाल्याचा प्रकार नुकताच घडलाय. -
या आलीशान गाडीतून एका कार्यक्रमाला जाताना विवानवर जयपूर पोलिसांनी कारवाई केलीय.
-
राजस्थानमधील जयपूरमधील एका लग्नाला जाण्यासाठी विवान आपल्या लॅम्बोर्गिनीने निघाला होता. यावेळेस तो स्वत:च गाडी चालवत होता. विवानच्या मागे दुसरी एक आलिशान गाडी चालत होती.
-
विवान लग्नाला जाण्यासाठी घाईत असतानाच पोलिसांनी त्याला एका ठिकाणी थांबवलं. तेव्हा विवानने पोलिसांना गाडी थांबवण्याचं कारण विचारलं.
-
त्यावर पोलिसांनी विवानला गाडीला पुढील बाजूस नंबर प्लेट नसल्याचं सांगितलं.
-
विवानला यासाठी दंड भरावा लागेल असं पोलिसांनी सांगितलं.
-
यावरुन विवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. विवानने माझी गाडी परदेशातील बनावटीची असल्याचं विवानने सांगितलं.
-
माझ्या गाडीमध्ये पुढील बाजूस नंबर प्लेट लावण्याची जागा उपलब्ध नसल्याचंही विवानने पोलिसांना सांगितलं.
-
गाडीच्या रचनेचा विचार करुन केवळ पुढेच नंबर प्लेट लावल्याचा दावा विवानने पोलिसांसमोर केला. मात्र पोलिसांनी दंड भरावाच लागेल असं सांगितलं.
-
नियमांच्या आधारे तुला पाच हजार दंड भरावा लागेल असं विवानला सांगण्यात आलं.
-
विवाननेही लग्नाला जायला उशीर होत असल्याने पाच हजारांचं चलान भरलं आणि पोलिसांपासून स्वत:ची सुटका करुन घेतली. (सर्व फोटो विवान कपूरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
Photos: पाच कोटींच्या कारमधून फिरणाऱ्या १९ वर्षीय भारतीय खेळाडूाला पोलिसांनी थांबवलं अन्…
सध्या या कारवाईमुळे हा १९ वर्षांचा तरुण खेळाडू चांगलाच चर्चेत आहे.
Web Title: Police action against india young 19 year old shooter vivaan kapoor scsg