-
-
एका मजुराने रेतीने भरलेली गोणी इमारतीच्या उंच मजल्यावर नेण्यासाठी वापरलेला हा जुगाड. एका मजुराने वाळूची पोती दोरीने बांधली आहे. त्यानंतर तो दोरीने शिडीवर चढतो, मग लटकतो आणि वाळूची गोणी वरच्या मजल्यावर जाते…(Photo: Twitter/ Naresh Nambisan)
-
हा मजुर तर आणखी दोन पावले पुढे गेला. वाळूची पोती उचलण्यासाठी त्याने स्कूटरचे मागचे चाक काढले आणि त्याऐवजी मोटार लावली. इकडे स्कुटर चालू केली की दुसरीकडे रेतीने भरलेली पोती उंच मजल्यावर पोहोचते. ..(Photo: Twitter/ pritiesanjay)
-
देसी जुगाड वापरून या व्यक्तीने दुमजली सायकल बनवून लोकांना आश्चर्यचकित केले. या फोटोमध्ये आजोबा सर्वात उंच सायकल चालवताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही त्या आजोबाचे आणि त्यांनी वापरलेल्या देसी जुगाडचे कौतुक केल्याशिवाय स्वतःला थांबवू शकणार नाहीत.(Photo: Instagram/salman.king7650)
-
या फोटोमध्ये एका वडिलांनी आपल्या लहान मुलासाठी जुगाड वापरून कार बनवलेली दिसत आहे. तब्बल ६८ दिवसात त्यांनी ही लाकडी कार बनवली. .(Photo: Twitter/ Dipanshu Kabra)
-
गेल्या महिन्यात आनंद महिंद्रा यांनी ‘जुगाड वाली जीप’चा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. जीप किक स्टार्ट झाली आणि त्यात मोटरसायकलचे इंजिन होते आणि टायर रिक्षाचे होते. (Photo: Twitter/Anand Mahindra)
-
दोन्हीही खोल्यांत एसीचा प्रभाव असावा, म्हणून हा अनोखा जुगाड केलाय. (Photo: Mr. Factopiya)
-
आपण कारमध्ये बसल्याचं फील यावं म्हणून केलेला हा जुगाड. एका घोडागाडीला कारचा आकार दिलाय. समोर घोडा दिसतोय आणि मागच्या बाजुला कार. (Photo: Mr. Factopiya)
-
या फोटोमध्ये सायकल रिक्षा दिसतेय. त्यात एक महिला बसलीय. सर्व बाजुंनी झाकलंय, छत्रीही घेतलीय कारण पाऊस पडतोय. (Photo: Mr. Factopiya)
PHOTO: हे देसी जुगाड पाहून बडे बडे इंजिनीअर देखील हैराण होतील!
एक गोष्ट मोठ्या विश्वासाने म्हणता येईल की, जुगाडच्या बाबतीत भारतीयांची बरोबरी कुणीच करू शकणार नाही. कारण, जुगाड करणं हे भारतीयांच्या जणू रक्तातच लिहिलंय. असेच काही हटके जुगाड एकदा पाहाच.
Web Title: Indian funny desi jugaad video viral on social media prp