-
सोशल मीडियावर सध्या एका ‘छोटी दीपिका’च्या व्हिडीओने सोशल मीडियाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. तिचे एक्सप्रेशन्स पाहून अभिनेता रणवीर सिंह सुद्धा तिच्या प्रेमात पडला. तिचा व्हिडीओ शेअर करत दीपिका पादूकोणची ‘मिनी वर्जन’ असं तिला म्हटलंय. तेव्हापासून ही ‘छोटी दीपिका’ सोशल मीडियावर बरीच चर्चेत आलीय. पाहूया ही ‘छोटी दीपिका’ आहे तरी कोण?
-
‘छोटी दीपिका’ म्हणून चर्चेत आलेल्या या मुलीचं नाव राशी शिंदे असं आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी सक्रिय असते.
-
राशी शिंदे ही बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणची सर्वात मोठी फॅन आहे. राशी शिंदे हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या व्हिडीओंचा खजिनाच दिसून येतो. यातील बहुतेक व्हिडीओ तिने दीपिका पादुकोणच्या चित्रपटावर केलेले आहेत.
-
दीपिका पादूकोणच्या चित्रपटातील वेगवेगळ्या सीनमधील व्हिडीओ शूट करताना ती हुबेहुब चित्रपटातील दीपिका पादूकोणसारखीच ड्रेसिंग आणि मेकअप करते.
-
राशी शिंदे हिने तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सनी लोकांना भुरळ पाडली आहे. इन्स्टाग्रामवर जवळजवळ १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
-
ती अल्पवयीन असल्याने तिची आई अश्विनी शिंदे तिचे इन्स्टाग्राम अकाउंट सांभाळते.
-
राशी शिंदे ही मुळची महाराष्ट्रातील शिर्डीची आहे. सध्या ती मुंबईत राहत असून इयत्ता सहावीचं शालेय शिक्षण घेतेय.
-
ती अवघ्या १२ वर्षाची असून इतक्या लहान वयात तिने आपल्या जबरदस्त एक्सप्रेशन्स आणि टॅलेंटने लाखो लोकांच्या मनावर राज्य करतेय.
-
सोशल मीडियावरील वेगवेगळ्या व्हिडीओ आणि जाहिरातीमधून ती ५ ते १० लाख रूपयांची कमाई करते.
-
राशी एक प्रोफेशनल डान्सर सुद्धा आहे. तसंच तिने वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्समध्ये सुद्धा काम केलंय.
-
लवकरच ती झी मराठीवरील एक शो होस्ट करताना सुद्धा दिसणार आहे.
-
सुरूवातीला राशीची आई सोशल मीडियावर व्हिडीओ बनवत होती. एकदा तिच्या आईने राशीसोबत एक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला.
-
आईने तिच्यासोबत केलेला व्हिडीओ इतका व्हायरल झाला की नंतर राशी शिंदे स्वतः व्हिडीओ बनवू लागली.
-
तिला भविष्यात अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे.
-
राशीच्या कुटुंबातील सर्वच जण तिला सपोर्ट करत असतात. तिची आई तिच्यासाठी गाणं निवडते, तिचे मामा तिचे व्हिडीओ शूट करतात तर तिचे वडील व्हिडीओ एडिट करून देतात. (Photo : Instagram/ rashi_shinde_807_)
Photos: सोशल मीडियावर व्हायरल झालेली ‘Chhoti Deepika Padukone’ नक्की आहे तरी कोण ?
‘छोटी दीपिका’ सोशल मीडियावर बरीच चर्चेत आलीय. पाहूया ही ‘छोटी दीपिका’ आहे तरी कोण?
Web Title: Chhoti deepika rashi shinde trend on twitter ranveer singh shares a video of a girl child recreating ram leela film scene prp