Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is nupur sharma bjp leader suspended for her remark on prophet muhammad photos kak

Photos : केजरीवालांविरोधात दिल्लीतून लढणाऱ्या भाजपा उमेदवार ते निलंबित प्रवक्त्या… कोण आहेत नुपूर शर्मा?

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर नुपूर शर्मा चर्चेत आल्या आहेत.

Updated: June 6, 2022 18:47 IST
Follow Us
  • Nupur Sharma latest news
    1/18

    भाजपाने रविवारी (५ जून) आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केलं.

  • 2/18

    नुपूर शर्मा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं.

  • 3/18

    नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर मुस्लीम गटांनी निदर्शने सुरू केली. सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान अशा राष्ट्रांनी शर्मा यांच्या या टिप्पणीनंतर नाराजी व्यक्त केली आहे.

  • 4/18

    यामुळे भाजपाने नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्येतेतून निलंबित केले असून त्यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले आहे.

  • 5/18

    भारतानेही आंतराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू स्पष्ट करत नुपूर शर्मा यांची टिप्पणी आणि भारत सरकारचा संबंध नसल्याचे सांगितले आहे.

  • 6/18

    भाजपाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर नुपूर शर्मा चर्चेत आल्या आहेत.

  • 7/18

    नुपूर शर्मा या व्यवसायाने वकील आहेत.

  • 8/18

    त्यांनी अर्थशास्त्र आणि वकिली विषयात पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

  • 9/18

    लंडनमधून नुपूर शर्मा यांनी वकिलीमधील पदव्युत्तर डिग्री संपादन केली आहे.

  • 10/18

    कॉलेजमध्ये असतानाच नुपूर शर्मा यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

  • 11/18

    दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या त्या अध्यक्षा होत्या.

  • 12/18

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिकीटावर नुपूर शर्मा निवडून आल्या होत्या.

  • 13/18

    नुपूर शर्मा या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कमिटीमध्येही होत्या.

  • 14/18

    भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय आणि कार्यक्षम प्रवक्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.

  • 15/18

    दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नुपूर शर्मा यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती.

  • 16/18

    परंतु, निवडणुकीत नुपूर शर्मा यांना पराभव पत्करावा लागला.

  • 17/18

    दरम्यान, भाजपने निलंबनाची कारवाई केल्यानंतर नुपूर शर्मा यांनी त्यांचे वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे.

  • 18/18

    “कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला कधीही उद्देश नव्हता”, असं त्यांनी म्हटलं आहे. (सर्व फोटो : नुपूर शर्मा/ इन्स्टाग्राम)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsपॉलिटिकल न्यूजPolitical Newsभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Who is nupur sharma bjp leader suspended for her remark on prophet muhammad photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.