• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. strict enforcement of helmet enforcement begins in mumbai action on 6000 people on the first day pvp

Photos : मुंबईत हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी ६ हजार जणांवर कारवाई

चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

June 10, 2022 12:42 IST
Follow Us
  • मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवार, ९ जूनपासून शहरात हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. (Express photo by Deepak Joshi)
    1/12

    मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवार, ९ जूनपासून शहरात हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. (Express photo by Deepak Joshi)

  • 2/12

    चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Express photo by Deepak Joshi)

  • 3/12

    पोलिस उपायुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यासाठी सुमारे ५० वाहतूक पोलिस चौक्या सतर्क राहतील. (Photo : Twitter/@Rtr_IPS)

  • 4/12

    गुरुवार ९ जूनपासून मुंबईतील हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येईल. (Express photo by Deepak Joshi)

  • 5/12

    त्यांचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, तसेच त्यांना ५०० रुपये दंड भरावा लागेल. (Express photo by Deepak Joshi)

  • 6/12

    सर्व ५० वाहतूक चौक्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. (Express photo by Deepak Joshi)

  • 7/12

    दरम्यान, कालपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. (Indian Express Photo)

  • 8/12

    काल पहिल्याच दिवशी ६२७१ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. (Express photo by Deepak Joshi)

  • 9/12

    यामध्ये २३३४ दुचाकी चालक, ३४२१ पिलियन रायडर्स, ५१६ दोन्ही दुचाकीस्वार असे मिळून एकूण ६२७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (Indian Express Photo)

  • 10/12

    यासंबंधीची एक पोस्ट मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे. (Photo : Twitter/@MTPHereToHelp)

  • 11/12

    मुंबई वाहतूक पोलिसांनी २५ मे रोजी एक अधिसूचना जारी करून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य केले होते आणि आदेशांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. (Indian Express Photo)

  • 12/12

    या अधिसूचनेत म्हटले आहे की, हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास ५०० रुपये दंड भरावा लागेल किंवा ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्यात येईल. (Indian Express Photo)

TOPICS
नियमRulesमुंबईMumbaiमुंबई पोलीसMumbai Police

Web Title: Strict enforcement of helmet enforcement begins in mumbai action on 6000 people on the first day pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.