-
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. यावरून आखाती देशांनी भारतावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर भाजपाने त्वरित नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण आखाती देश भारतासाठी का महत्त्वाचे आहेत? चला जाणून घेऊया…
-
देशात आयात होणारं ६० टक्के कच्चे तेल हे आखाती देशांतून आयात केलं जातं. यामध्ये इराक आणि सऊदी अरब देशांचा वाटा सर्वाधिक असून दोन्ही देशातून अनुक्रमे २२ आणि १९ टक्के कच्चे तेल आयात केलं जातं. युएई देशातून देखील ९ टक्के तेल आयात केलं जातं.
-
संयुक्त अरब अमिरात (यूएई) भारताचे तब्बल २६.९ टक्के आर्थिक व्यवहार होतात. तर सौदी अरब आणि कतार यांचे अनुक्रमे ११.६ टक्के आणि ६.५ टक्के आर्थिक व्यवहार होतात.
-
आखाती देशातील युएईमध्ये भारत सर्वाधिक निर्यात करते. निर्यातीमध्ये युएईची हिस्सेदारी ९.२ टक्के इतकी आहे. इतरही आखाती देशात भारत विविध प्रकारची उत्पादने निर्यात करतो.
-
व्यापाराच्या दृष्टीने युएई हा भारताचा सर्वात मोठा तिसऱ्या क्रमाकांचा व्यापारीक भागीदार आहे. दोन्ही देशात २०१९-२० या आर्थिक वर्षात तब्बल २८ हजार ८५४ मिलियन डॉलरचा व्यापार झाला आहे. त्यानंतर सौदी अरबसोबत ६ हजार २३६ मिलियन डॉलरची उलाढाल झाली आहे.
-
याशिवाय आखाती देशात भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. येथील प्रत्येक तिसरी व्यक्ती भारतीय नागरिक आहे. त्यामुळे आखाती देशांची नाराजी ओढावून घेणं भारताला परवडणारं नाही. युएईमध्ये एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के नागरिक हे भारताचे नागरिक आहेत. तर सऊदी अरबमध्ये जवळपास ८ टक्के नागरिक भारताचे आहेत. (सर्व फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: आखाती देश भारतासाठी का महत्त्वाचे आहेत?
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं आहे.
Web Title: Why gulf countries more important to india prophet mohammad insulting case nupur sharma rmm