-
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.
-
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.
-
मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना महापुजेचा मान मिळाला.
-
५२ वर्षीय शेतकरी मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले (४७) हे मागील २० वर्षांपासून न चुकता पायी वारी करत आहे. हे शेतकरी दाम्पत्य १९८७ पासून न चुकता वारी करत आहेत.
-
या महापुजेनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंढरीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही दिली. त्याबाबत विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे. (फोटो सौजन्य- सह्याद्री)
-
आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत महाराष्ट्रातील देहू, आळंदी, शेगाव आणि पैठण येथून पायी चालत पंढरीच्या पावनभूमीकडे आले आहेत.
-
राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्ठकरी, कामकार, शेतमजूर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि समाजातील प्रत्येक घटकाला हे वर्ष सुखाचं, आनंदाच आणि समृद्धीचं जावो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी पांडूरंग चरणी केली.
-
देशभरातील विविध मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (सर्व फोटो-सोशल मीडियावरून साभार)
पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली आषाढी एकादशीची महापूजा; पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फोटो
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.
Web Title: Cm eknath shinde mahapooja ashadhi ekadashi 2022 pandharpur vitthal rukmini temple photos rmm