-
दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहीत २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस फोटो/प्रवीण खन्ना)
-
जवळपास दहा तासांपासून सीबीआय सिसोदियांच्या घरी तपास करत आहे. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस फोटो/प्रवीण खन्ना)
-
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याविरोधात सीबीआयनं मनीष सिसोदियांसोबत १५ आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सिसोदियांना घोटाळ्यातील मुख्य आरोपी सांगण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस फोटो/प्रवीण खन्ना)
-
सिसोदिया यांनी गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस फोटो/प्रवीण खन्ना)
-
सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत १५ जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस फोटो/प्रवीण खन्ना)
-
दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस दिल्लीच्या नायब राज्यपालांनी केली होती. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस फोटो/प्रवीण खन्ना)
-
“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या सीबीआयकडून केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे.
-
सिसोदिया यांच्याविरोधातील या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
-
“दिल्लीमधील शिक्षण आणि आरोग्य सेवेवर होत असलेल्या कामाची दखल जगभरात घेतली जात आहे. या कामाला यांना थांबवायचे आहे. याच कारणामुळे आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. ७५ वर्षातील सर्व चांगल्या कामांना थांबवण्याचे काम करण्यात येत आहे. याच कारणामुळे भारत पिछाडीवर आहे,” असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
मनीष सिसोदियांच्या घरी सीबीआयची छापेमारी, १० तासांपासून तपास सुरू, पाहा Photos
दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहीत २१ ठिकाणी छापेमारी केली आहे.
Web Title: Cbi raid at delhi minister manish sisodia house search operation from 10 hours see photos rmm