• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. when rakesh jhunjhunwala was asked about his crumpled shirt when he met pm scsg

Photos: ‘दिवसाला आठ कोटी कमावणाऱ्या’ झुनझुनवालांनी PM मोदींना भेटायला जाताना चुरगळलेला शर्ट का घातला होता?

१४ ऑगस्ट रोजी निधन झालेल्या झुनझुनवालांची एकूण संपत्ती ४६,००० कोटी इतकी आहे.

Updated: August 23, 2022 18:54 IST
Follow Us
  • When Rakesh Jhunjhunwala was asked about his crumpled shirt when he met PM
    1/30

    भारतातील सर्वात श्रीमंत आणि मुरब्बी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. ६२ व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांचं निधन झाल्याची बातमी सकाळीच प्रसारमाध्यमांवर झळकली आणि अनेकांना धक्का बसला.

  • 2/30

    भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून चांगला पैसा कमावता येतो आणि तो टिकवताही येतो, याचा वस्तुपाठ घालून देणारे झुनझुनवाला हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३६ व्या स्थानी होते. फोर्ब्सच्या यादीनुसार झुनझुनवालांची एकूण संपत्ती ४६,००० कोटी इतकी आहे.

  • 3/30

    झुनझुनवाला यांच्या निधनाला एक आठवडा उलटून गेल्यानंतरही त्यांच्यासंदर्भातील बातम्या आणि किस्से सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. असाच एक किस्सा आहे झुनझुनवाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यानचा.

  • 4/30

    गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या झुनझुनवाला यांनी यांनी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

  • 5/30

    या भेटीदरम्यान झुनझुनवाला यांच्या अंगावरील शर्टची सोशल मीडियावर फारच चर्चा रंगली होती. काही हजार कोटींचा मालक असणारा गुंतवणूकदार देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जाताना असं शर्ट का घालून गेला याबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली.

  • 6/30

    झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर अनेकांना त्यांचा हा शर्ट आठवला असून हा शर्टमध्ये त्यांच्या साधेपणाचं उदाहरण होतं अशा अर्थाने अनेक पोस्ट १४ ऑगस्टनंतर व्हायरल झाल्या आहेत.

  • 7/30

    काहींनी तर झुनझुनवाल यांच्या संपत्तीचा संदर्भ देत दिवसाला आठ कोटी कमवणारा अशा कपड्यांमध्ये आणि महिना २० हजार कमवणारा सूटाबुटात फिरतो अशा अर्थाचे फोटोही व्हायरल केले.

  • 8/30

    हे फोटो सुद्धा झुनझुनवाला यांच्या साधेपणाचं उदाहरण म्हणून व्हायरल झाले.

  • 9/30

    मात्र मोदींसोबतच्या या भेटीमध्ये असं चुरगळलेलं वाटणारं शर्ट झुनझुनवाला का घालून गेले होते याबद्दल त्यांनीच नंतर एका मुलाखतीमध्ये सविस्तर खुलासा केला होता. या शर्टामागील किस्सा जाणून घेऊयात…

  • 10/30

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच झुनझुनवालांसोबतचा एक खास फोटो शेअर केल्याने या भेटीची प्रसारमाध्यमांबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही फारच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं होतं.

  • 11/30

    राकेश झुनझुनवाला यांना भेटून फार आनंद झाला. ते फार बोलते, माहितीपूर्ण आणि भारताबद्दल हीरहिरीने बोलणारे असल्याचं मोदींनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

  • 12/30

    मात्र ही भेट नक्की कशासाठी झाली होती आणि या भेटीत काय काय चर्चा झाली याबद्दल झुनझुनवाला यांनी त्याच महिन्यामध्ये पार पडलेल्या इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्ह २०२१ या कार्यक्रमामध्ये केला होता.

  • 13/30

    मोदींना भेटण्याआधी झुनझुनवाला हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाही भेटले होते. या भेटीचा फोटो निर्मला यांच्या कार्यालयाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला.

  • 14/30

    राकेश झुनझुनवाला हे दिल्लीत दिसणं तसं दुर्मिळ आहे, असं म्हणत पत्रकार राहुल कनवालने झुनझुनवाला यांना या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला होता.

  • 15/30

    आधी तुम्ही अर्थमंत्र्यांना भेटले नंतर तुम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनी तुम्हाला का बोलवलं हा प्रश्न बाजूला ठेऊयात. पण तुम्ही मोदींना आणि मोदींनी तुम्हाला काय सांगितलं?, असा थेट प्रश्न राहुल यांनी विचारला होता.

  • 16/30

    “मी मधूचंद्राच्या दिवशी माझ्या पत्नीशी काय बोलणं झालं हे तुम्हाला सांगणार आहे का?,” असा उपरोधिक प्रश्न झुनझुनवाला यांनी राहुल यांना या प्रश्नाचं उत्तर देताना विचारला होता. झुनझुनवाला यांनी प्रश्नाला उत्तर म्हणून हा मजेदार प्रश्न विचारल्याने अनेकजण हसू लागले.

  • 17/30

    “ती एक हायफ्रोफाइल मिटींग होती. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी फोटो ट्विट केलाय,” असंही झुनझुनवाला या बैठकीबद्दल म्हणाले होते.

  • 18/30

    “माझ्याकडे त्या भेटीचे फोटोही नाहीयत. मला तर फोनही घेऊन जायला परवानगी नव्हती,” असंही झुनझुनवाला म्हणाले होते.

  • 19/30

    “त्यामुळे मला फोटो काढण्याची संधीच नव्हती. समोरची व्यक्ती पंतप्रधान आहे ऐवढाच विचार माझ्या डोक्यात होता,” असंही त्यांनी भेटीबद्दलची माहिती देताना सांगितलं.

  • 20/30

    “मी भाजपा समर्थक आहे. मी मोदी समर्थक आहे,” असंही झुनझुनवाला जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.

  • 21/30

    तसेच झुनझुनवाला यांनी भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेईल असं मला वाटतंय, असंही मत व्यक्त केलं होतं.

  • 22/30

    याचबद्दल मी प्रेझेन्टेशन दिलं की मला असं का वाटतंय. मी त्यांना समर्थन का देतो हे ही त्यांच्या कानावर घातल्याचं झुनझुनवाला यांनी स्पष्ट केलेलं.

  • 23/30

    “पंतप्रधान मला का भेटले हे तुम्ही त्यांना विचारा,” असं झुनझुनवाला यांनी याचसंदर्भातील प्रश्नावर बोलताना आधी म्हटलं होतं. मला ठाऊक नाही की ते मला का भेटले, असंही यावेळी बोलताना झुनझुनवाला म्हणालेले.

  • 24/30

    मोदींसोबतच्या भेटीदरम्यान तुम्ही घातलेल्या शर्टवरुन बरीच चर्चा झाली असा संदर्भ देत झुनझुनवाला यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “मी घातलेला शर्ट हा प्रॉपर व्हाइट शर्ट होता,” असं म्हणत उत्तरास सुरुवात केली.

  • 25/30

    “मी ताजमध्ये थांबलो होतो. मी ६०० रुपये देऊन तो इस्त्री करुन घेतला होता,” असंही त्यांनी या शर्टासंदर्भात बोलताना स्पष्ट केलं होतं.

  • 26/30

    तरीही तो शर्ट असा (चुरगळल्यासारखा) दिसत होता, असं झुनझुनवाला यांनी मुलाखतीमध्ये उत्तर देताना सांगितलेलं.

  • 27/30

    तसेच, “मी माझ्या ऑफिसमध्ये असेच शॉर्ट्स घालतो,” असंही झुनझुनवाला म्हणाले होते.

  • 28/30

    कोणी कस्टमर येत नाही, क्लायंट येत नाही काय करणार आवरुन सावरुन? असा प्रश्न त्यांनी शर्टवरुन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केलेला.

  • 29/30

    याच पांढऱ्या शर्टाचा संदर्भ घेत झुनझुनवाला यांनी आपला अनेक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्याचंही स्पष्ट केलेलं.

  • 30/30

    “मी गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने पाहतो,” असं त्यांनी या शर्टसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंग, ट्विटर, पीटीआय, रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: When rakesh jhunjhunwala was asked about his crumpled shirt when he met pm scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.