-
जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.
-
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की कोविड-19 दरम्यान चिंता आणि निराशा २५% पर्यंत वाढली आहे.
-
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण एकत्रितपणे त्यावर काम केले पाहिजे.
-
सध्या विविध सामाजिक विषयांवरचे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. समस्या कोणतीही असो, चित्रपटाच्या माध्यमातून त्याविषयी सहज जनजागृती निर्माण करता येते.
-
आजकाल मेंटल हेल्थ इश्युवर भाष्य करणारे देखील अनेक चित्रपट बनवले जात आहेत. ज्यांच्यामुळे मानसिक आरोग्याविषयी समाजात जनजागृती निर्माण केली जात आहे.
-
अनेक कलाकारांनी अशा विषयातील चित्रपटांमध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
-
तर आज मानसिक आरोग्यदिनानिमित्त जाणून घेऊया अशा ५ चित्रपटांबद्दल जे पाहिल्यावर मानसिक आरोग्यावर नक्की फरक पडेल.
-
डियर जिंदगी अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट मानसिक आरोग्यावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत आहे, जी तिच्या ब्रेकअपनंतर खूप मानसिक तणावात असते. यामुळे, ती थेरपिस्टकडे जाण्याचा निर्णय घेते. त्याची भूमिका शाहरुखने साकारली आहे. शाहरुख तिला या तणावावर मात करण्यास मदत करतो. या चित्रपटाने अनेकांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची प्रेरणा दिली.
-
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा ‘तारे जमीन पर’ हा असा चित्रपट आहे, ज्याला आजपर्यंत कोणताही चित्रपट टक्कर देऊ शकत नाही. ‘तारे जमीन पर’ची कथा मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या आणि डिस्लेक्सिया नावाचा आजार असलेल्या मुलाभोवती फिरते. या आजारात मुलाला लिहिणे-वाचण्यात अडचण येते. त्याला शब्द आणि संख्या यांच्याशी सतत झगडावे लागते. एवढ्या लहान वयात हा लहान मुलगा कोणकोणत्या परिस्थितीला सामोरा जातो. हे यात सांगण्यात आलंय.
-
अतरंगी रे अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान अभिनित ‘अतरंगी रे’ चित्रपटामध्ये रिंकू नावाचे पात्र दाखवले आहे, जे एका काल्पनिक व्यक्तीशी संवाद साधते. सारा अली खानने ही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर साकारली आहे. या मुलीला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. मात्र, यावर ती कशी मात करते आणि यात तिला आजुबाजुंचे लोक कशी मदत करतात, याची कथा दाखवण्यात आली आहे.
-
छिछोरे अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘छिछोरे’ या चित्रपटात परीक्षेतील चिंता आणि आत्महत्या या गोष्टी अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने दाखवल्या आहेत. परीक्षेच्या दबावामुळे एक मुलगा कसा आत्महत्येचा प्रयत्न करतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. नापास होण्याच्या भीतीने हे सर्व घडते. विद्यार्थी नापास होण्याच्या भीतीने तणावात असतात आणि त्यातून या घटना घडतात. सर्वांनाच हा चित्रपट खूप आवडला होता.
-
‘तमाशा’ हा चित्रपट बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरनेग्रस्त तरूणाभोवती फिरतो. या विकाराने त्रस्त असणाऱ्या माणसाच्या आयुष्य कसे चेंज होते, ते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणाऱ्या रणबीरला त्याच्या मैत्रिणीची भूमिका करणारी दीपिका या समस्येवर मात करण्यासाठी मदत करते.
World Mental Health Day 2022: आलियाचा डिअर जिंदगी , सुशांतचा छिछोरे…मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
आज जागतिक मानसिक आरोग्यदिनी जाणून घेऊया अशा चित्रपटांबद्दल, जे तुम्हाला नक्की पाहिले पाहीजेत.
Web Title: Bollywood movies to watch on world mental health day gps