-
केळं हे फळ शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि डॉक्टरही ते योग्य वेळी खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही क्वचितच कधी सरळ केळे पाहिले असेल. बहुतांश केळी अर्धवर्तुळाकर आकारात म्हणजेच कधीही सरळ नसतात.
-
केळी नेहमी वाकडीच का असतात, याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? केळी नेहमी वाकडीच असण्यामागे नेमकं काय कारण आहे? याबद्दल आज आपण तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.
-
केळं उगवण्याआधी प्रथम केळ्याचे फूल येते. त्या फुलाच्या पाकळ्यांखाली केळीच्या लहान फळांची रांग वाढू लागते.
-
केळ्याचे फळ आकाराने मोठे झाले की ते निगेटिव्ह जिओट्रोपिझम नावाच्या प्रक्रियेतून जाते. याचा मूळ अर्थ असा की केळ्याचे फळ सतत जमिनीकडे वाढण्याऐवजी ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळू लागतात.
-
केळी अशा ठिकाणी उगवतात, जिथे सूर्यप्रकाश कमी असतो. यामुळेच केळी नंतर वरच्या दिशेने म्हणजेच सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढू लागते. यामुळेच त्यांचा आकार वाकडा होतो.
-
केळीची झाडे प्रथम पर्जन्यवनाच्या मध्यभागी होती. अशा ठिकाणी सूर्यप्रकाश फारच कमी प्रमाणात पोहोचायचा.
-
त्यामुळे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी केळी आधी जमिनीकडे आणि नंतर सूर्यप्रकाशाकडे सरकतात. त्यामुळे या फळाचा आकार वाकडा झाला आहे.
-
हिंदू संस्कृतीमध्ये केळीची वनस्पती पवित्र मानली जाते. भारतात याची पूजादेखील केली जाते. असे मानले जाते की सुमारे ४००० वर्षांपूर्वी मलेशियामध्ये केळीची लागवड झाली.
-
केळी हे एकमेव झाड नाही जे निगेटिव्ह जिओट्रोपिझमशी संबंधित आहे. सूर्यफुलाचेही सूर्याशी असेच नाते आहे. दिवशभरत सूर्य जिकडे जातो तिकडे सूर्यफुलाचे फूलही वळते. (Photos: Pexels)
केळी नेहमी वाकडीच का असतात? शास्त्रज्ञांनी शोधून काढलं या कोड्याचं उत्तर
केळी नेहमी वाकडीच असण्यामागे नेमकं काय कारण आहे? याबद्दल आज आपण तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.
Web Title: Do you know why are bananas not straight scientists found the answer to this riddle pvp