-

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
-
अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. यानंतर आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
-
या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.
-
अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
-
देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही- अरविंद केजरीवाल
-
आम्ही देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. देशातील बेरोजगार युवक आहेत. आमच्यासमोर शेतकरी आहेत. आमच्यासमोर गृहिणी आहेत. आमच्यासमोर महागाई आहे, अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली – अरविंद केजरीवाल
-
जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू… आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या (भाजपा) पार्टीप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत- अरविंद केजरीवाल
-
उद्धव ठाकरे यांच्या पार्टीची चोरी झाली आहे. त्याच्या पक्षाचं चिन्ह चोरी झालं. त्यांच्या पक्षाचं नाव चोरी गेलं- अरविंद केजरीवाल
-
उद्धव ठाकरेंकडे जे काही होतं, ते सगळं चोरी करून नेलं- अरविंद केजरीवाल
-
मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते आणि हे वाघाचे पुत्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यांच्याबरोबर आहे.- उद्धव ठाकरे
-
त्यामुळे मी पूर्ण आशा करतो की, सर्वोच्च न्यायालयाकडून यांना संपूर्ण न्याय मिळेल. आणि आगामी प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंना प्रचंड यश मिळेल- अरविंद केजरीवाल (सर्व फोटो- लोकसत्ता/एएनआय)
“बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांचे पुत्र…”, आगामी निवडणुकीबाबत केजरीवालांचं मोठं भाष्य
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
Web Title: Aravind kejriwal meet uddhav thackeray in mumbai praise balasaheb thackeray election rmm