• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. tax free countries saudi arabia qatar oman malta mexico bahamas bahrain panama know detail snk

Tax Free Countries: जनतेकडून एक पैसाही कर घेत नाही ‘या’ देशांचे सरकार! संपूर्ण कमाई येते हातात

सरकार दोन प्रकारचे कर वसूल करते. यापैकी एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर.

May 27, 2023 15:09 IST
Follow Us
  • Tax Free Countries (फोटो सौजन्य -Freepik)
    1/12

    Tax Free Countries: जगातील बहुतेक देशांमध्ये कर हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. सरकार जनतेकडून दोन प्रकारे कर वसूल करते. एक प्रत्यक्ष कर (Direct Tax) आणि दुसरा अप्रत्यक्ष कर (Indirect Tax) . सरकार जनतेकडून वसूल केल्या जाणाऱ्या करातून देशात विकासाची कामे करतात.(फोटो सौजन्य -Freepik)

  • 2/12

    पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, असेही काही देशदेखील आहेत जिथे लोकांना एक पैसाही कर भरावा (Tax Free Countries) लागत नाही . असे असूनही या देशांतील लोकांना सरकारकडून चांगल्या सुविधा मिळतात. एवढेच नाही तर हे देश वेगाने प्रगती करत आहेत.(फोटो सौजन्य -Freepik)

  • 3/12

    भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये लोकांना कर भरावा लागतो. पण असे काही देशही आहेत ज्यांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही. लोकांची संपूर्ण कमाई त्यांच्या खात्यात येते. चला जाणून घेऊया असे कोणते देश आहेत जे जनतेकडून कर घेत नाहीत.(फोटो सौजन्य -Freepik)

  • 4/12

    बहामास
    बहामास देश ज्याला पर्यटकांसाठी स्वर्ग म्हटले जाते, तो पश्चिम गोलार्धात (Western Hemisphere) येतो. या देशाची खास गोष्ट म्हणजे येथे राहणाऱ्या नागरिकांना प्राप्तीकर भरावा लागत नाही. पण सरकार व्हॅट आणि मुद्रांक शुल्क सारखे शुल्क आकारते.(फोटो सौजन्य – piaxbay)

  • 5/12

    यूएई
    संयुक्त अरब अमिराती हा आखाती प्रदेशातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. तेल आणि पर्यटनामुळे यूएईची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. त्यामुळे यूएईमधील लोकांना प्राप्तीकरातून सवलत देण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – piaxbay)

  • 6/12

    बहरीन
    आखाती देश बहरीनमध्येही नागरिकांना त्यांच्या कमाईवर कोणत्याही प्रकारचा प्राप्तीकर भरण्याची गरज नाही. बहरीनमध्ये सरकार जनतेकडून कर वसूल करत नाही.(फोटो सौजन्य – piaxbay)

  • 7/12

    पनामा
    पनामा या मध्य अमेरिकन देशात नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही. येथे समुद्रकिनारे आणि कॅसिनोची मोठी साखळी आहे. जेथे भांडवली नफ्यावरही कर भरावा लागणार नाही.(फोटो सौजन्य – piaxbay)

  • 8/12

    ओमान
    बहरीन आणि कुवेत व्यतिरिक्त आखाती देश ओमानचाही या यादीत समावेश आहे. ओमानचे नागरिकांना प्राप्तीकर भरावा लागत नाही. याचे कारण ओमानचे तेल आणि वायू क्षेत्र मजबूत असल्याचे मानले जाते.(फोटो सौजन्य – piaxbay)

  • 9/12

    कतार
    ओमान, बहरीन आणि कुवेत सारख्या कतारचीही हीच स्थिती आहे. कतार तेल क्षेत्रातही खूप मजबूत आहे. हा देश निःसंशय छोटा आहे पण इथे राहणारे लोक खूप श्रीमंत आहेत. येथेही प्राप्ती कर आकारला जात नाही.(फोटो सौजन्य – piaxbay)

  • 10/12

    आता अशाच काही देशांची यादी देत ​आहोत जिथे जवळपास 35 टक्के कर भरावा लागतो. तर भारतात ४२ टक्क्यांहून अधिक कर भरावा लागतो. (फोटो सौजन्य -Freepik)

  • 11/12

    मेक्सिको आणि माल्टा
    मेक्सिको हा जगातील एकमेव देश आहे जिथे नागरिकांना जास्तीत जास्त 35% कर भरावा लागतो. माल्टावरही कमाल ३५ टक्के कर आहे.(फोटो सौजन्य – piaxbay)

  • 12/12

    जॉर्डन, त्रिनिदाद आणि टोबॅगो
    जॉर्डनमध्ये कर स्तर 30 टक्के आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये नागरिकांवर 30 टक्के कर आकारला जातो. आणि मलेशियामध्ये 28 टक्के कर दर आहे. तर ब्राझीलमध्ये २७.५ टक्के कर आहे.(फोटो सौजन्य – piaxbay)

TOPICS
टॅक्सTax

Web Title: Tax free countries saudi arabia qatar oman malta mexico bahamas bahrain panama know detail snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.