• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pakistan handed over this historic and beautiful hotel to america for money see photos vrd

पाकिस्ताननं पैशासाठी हे काय केलं? आपलं ऐतिहासिक अन् सुंदर हॉटेल अमेरिकेकडे सोपवलं, पाहा फोटो

न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये पाकिस्तानचे १०० वर्षांहून अधिक जुने आणि आलिशान रुझवेल्ट हॉटेल आहे, जे न्यूयॉर्कमधील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठ्या हॉटेल्समध्ये गणले जाते. पाकिस्तानने दीर्घ संघर्ष आणि वाटाघाटीनंतर हे हॉटेल न्यूयॉर्क प्रशासनाला २२० दशलक्ष डॉलर्स करारावर भाड्याने दिले आहे. हे हॉटेल खरोखर एक आलिशान आणि अमूल्य मालमत्ता आहे.

Updated: June 11, 2023 18:16 IST
Follow Us
  • roosevelt hotel 6
    1/13

    पाकिस्तान सरकारची परदेशात दोन मोठी हॉटेल्स आहेत, एक न्यूयॉर्कमध्ये आणि दुसरे पॅरिसमध्ये आहे. ही दोन्ही हॉटेल्स त्यांच्या लोकेशनमुळे आणि प्रेक्षणीय असल्यामुळे चर्चेत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत या हॉटेलांनाही तोटा सहन करावा लागत आहे. यामध्ये न्यूयॉर्कमध्ये असलेले रुझवेल्ट हॉटेल खूप मोठे आणि ऐतिहासिक आहे. (courtesy the roosevelt hotel site)

  • 2/13

    न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये पाकिस्तानचे १०० वर्षांहून अधिक जुने आणि आलिशान रुझवेल्ट हॉटेल आहे, जे न्यूयॉर्कमधील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठ्या हॉटेल्समध्ये गणले जाते. पाकिस्तानने दीर्घ संघर्ष आणि वाटाघाटीनंतर हे हॉटेल न्यूयॉर्क प्रशासनाला २२० दशलक्ष डॉलर्स करारावर भाड्याने दिले आहे. हे हॉटेल खरोखर एक आलिशान आणि अमूल्य मालमत्ता आहे. (courtesy the roosevelt hotel site)

  • 3/13

    गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानचे हे हॉटेल मोठ्या तोट्यात होते. कोरोनाच्या काळात हॉटेलची अर्थव्यवस्था डळमळीत झाली. दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून खुद्द पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे पाकिस्तानला ते विकून मोठा पैसा मिळू शकतो, अशी चर्चा होती, पण आता पाकिस्तानने ते तीन वर्षांसाठी लीजवर म्हणजेच भाडेकरारावर दिले आहे (courtesy the roosevelt hotel site)

  • सध्या या हॉटेलमध्ये १९ मजले आहेत. येत्या काळात पाकिस्तान व्यापाराच्या उद्देशाने ४० मजलेही बनवू शकतो. हे हॉटेल अमेरिकेच्या काही सरकारी कंपन्यांनी संयुक्तपणे बांधले आहे. ते १९२४ मध्ये उघडण्यात आले. त्याची रचना आणि आतील सामान उत्कृष्ट आहे. मॅनहॅटनमधलं हे ठिकाण खूप खास आहे. (courtesy the roosevelt hotel site)
  • 4/13

    ज्या कंपनीने ते चालवायला घेतले, त्याचे नाव न्यूयॉर्क युनायटेड हॉटेल्स इनकॉर्पोरेटेड असे होते. १९३४ मध्ये ते दिवाळखोरीत निघाले. त्यानंतर रुझवेल्ट हॉटेल्स इनकॉर्पोरेटने ते चालवण्यास सुरुवात केली. १९४३ मध्ये हिल्टन हॉटेलने त्याचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली अन् नंतर त्यांना त्याची मालकी मिळाली. हे हॉटेल १९५६ मध्ये पुन्हा विकले गेले. (courtesy the roosevelt hotel site)

  • 5/13

    यावेळी त्याचे मालक हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका झाले. १९७८ मध्ये हे हॉटेल पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. वर्ष २००० मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि प्रिन्स फैसल बिन खालिद बिन अब्दुलअजीज अल साद यांनी मिळून ते विकत घेतले. त्यानंतर पीआयएने त्यांच्याकडून प्रिन्सचा हिस्साही विकत घेतला. पण २०२० मध्ये वाढत्या आर्थिक नुकसानीमुळे हॉटेल बंद झाले. (courtesy the roosevelt hotel site)

  • 6/13

    कोरोनाने त्याला आणखी एक झटका दिला. आता ते पाकिस्तानने भाडेतत्त्वावर दिले आहे. हे हॉटेल केवळ न्यूयॉर्क शहरातील प्राइम लोकेशनवर नाही, तर ते ४३,३१३ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. (courtesy the roosevelt hotel site)

  • 7/13

    यात तीन तळघरं आहेत, जी पार्किंगसाठी वापरली जातात. सध्या हॉटेलची इमारत ७६ मीटर उंच आहे. देशाचे नुकसान भरून निघाल्यास ही इमारत आणखी वाढवण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे आणि अन्य व्यावसायिक कारणांसाठी वापरली जाईल. (courtesy the roosevelt hotel site)

  • मुख्य लॉबी क्षेत्र, जेवणाची खोली, नाश्ता खोल्या पहिल्या मजल्यावर आहेत, ते सुंदर आहे. या संपूर्ण हॉटेलमध्ये १०५७ खोल्या आहेत, त्यामुळे हे हॉटेल किती मोठे असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. त्याचे इंटेरियर अमेरिकेच्या जुन्या शैलीसारखे आहे. (courtesy the roosevelt hotel site)
  • 8/13

    या हॉटेलमध्ये ३०००० फूट बैठकीची जागा आहे. दोन बॉलरूम आणि १७ मीटिंग रूम्स आहेत. एका आधुनिक हॉटेल्समध्ये जे काही हवे ते सर्व यात आहे. (courtesy the roosevelt hotel site)

  • 9/13

    पहिल्या दोन मजल्यावर सर्व सुविधा आहेत, त्यानंतर हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठीच्या खोल्या तिसऱ्या मजल्यावरून सुरू होतात. प्रत्येक मजल्यावर राहणाऱ्यांसाठी विशेष सुविधाही आहेत. (courtesy the roosevelt hotel site)

  • 10/13

    हॉटेलच्या अवाजवी आकारामुळे त्याची देखभाल, कर्मचारी आणि आर्थिक समस्याही वाढतात. हॉटेल विकत घेतल्यापासून पाकिस्तानचेही नेहमीच नुकसान होत आहे. (courtesy the roosevelt hotel site)

  • मात्र, भरपूर पैसा खर्च करून त्याचे नूतनीकरणही करून घेण्यात आलेय. यामुळे हॉटेलही तात्पुरते बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानलाही हे हॉटेल अनेकवेळा विकण्याची इच्छा आहे. (courtesy the roosevelt hotel site)
TOPICS
पाकिस्तानPakistan

Web Title: Pakistan handed over this historic and beautiful hotel to america for money see photos vrd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.