-
तुम्ही कुठे बाहेर फिरण्यासाठी गेलात तर हॉटेलमध्ये स्टे करत असाल, पण तुम्हाला कधी एखादे हॉटेल 3 स्टार आहे, 5 स्टार आहे की 7 स्टार आहे हे कसे ठरवले जाते असा प्रश्न पडला का? जर पडला असेल तर आपण आज 1 स्टारपासून 7 स्टार हॉटेलमधील फरक जाणून घेऊ..
-
वन स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची अगदी साधी सिंपल व्यवस्था असते. तसेच या हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्चही तुलनेने खूप कमी असतो. अनेकांना वन स्टार हॉटेल्स सहज परवडतात. यात तुम्हाला स्वच्छ खोल्या, स्वच्छ बेडशीट, टॉयलेटची व्यवस्था, गरम व थंड पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधा मिळतात. पण या हॉटेल्समधील खोल्या खूप लहान असतात.
-
टू स्टार हॉटेल्समधील सुविधा वन स्टार हॉटेल्सपेक्षा थोड्या चांगल्या असतात. अशा हॉटेल्समधील खोलीचा आकार थोडा मोठा असू शकतो. अशा हॉटेल्समध्ये एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला १५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. यात तुम्हाला झोपण्यासाठी चांगला बेड, स्वच्छ बाथरुम, बेडशीटसह काही अन्य सुविधा मिळतात. काही हॉटेल्स टीव्हीची सुविधा देखील पुरवतात.
-
थ्री स्टार हॉटेल्समधील खोल्या आकाराने मोठ्या असतात, यातील अनेक खोल्यांमध्ये एसीची सुविधा असते शिवाय ग्राहकांना वायफाय, टीव्हीची सुविधाही दिली जाते. या हॉटेल्समधील दरवाजांना फिटेड लॉक असते, याशिवाय पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. या हॉटेल्समध्ये राहण्यासाठी तुम्हाला एका दिवसासाठी २००० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात.
-
फोर स्टार हॉटेल्समध्ये सुइट रूम आणि बाथरूममध्ये बाथ टबसारख्या सुविधा मिळतात. याशिवाय वायफाय, मिनी बार, फ्रिज आदी सुविधा दिल्या जातात. याशिवाय वायफाय, टीव्ही आणि चहा, कॉफीच्या सुविधाही असतात. अशा हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्च थोडा जास्त असतो.
-
फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हॉस्पिटॅलिटीकडे विशेष लक्ष दिले जाते. याठिकाणी ग्राहकांना आरामदायी अनुभव मिळावा म्हणून अनेक लक्झरी सुविधांची विशेष काळजी घेतली जाते. तेथे आलेल्यांना अनेक मल्टी क्लास सुविधा दिल्या जातात. २४ तास कॉफीची सुविधा उपलब्ध असते. या हॉटेलमधील खोलीचा आकार खूप मोठा असतो. त्याशिवाय फोर स्टार हॉटेल्समधील सुविधांसह येथे तुम्हाला अॅडीशनल जिम, स्विमिंग पूल अशा अनेक लक्झरी सुविधाही मिळतात.
-
सेव्हन स्टार हॉटेल्स हे अलिशान बंगल्यापेक्षाही कमी नसतात. तुमच्या स्वप्नातील अलिशान घरात राहिल्याचा अनुभव येथे आल्यावर येतो. अलिशान खोल्या, लक्झरी सुविधा याठिकाणी ग्राहकांना मिळतात. ग्राहकांना पिकअप- ड्रॉप करण्यापासून अनेक गोष्टींची काळजी या हॉटेल्सकडून घेतली जाते. याठिकाणी 5 स्टार हॉटेल्सपेक्षा अनेक आलिशान सुविधा आहेत.
-
कोणत्याही हॉटेलला तिथेल रुम, बाथरुम, लॉबी, रेस्टॉरंट, फूड, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल इत्यादी सुविधांच्या आधारे रेटिंग दिले जाते. (फोटो – all photos freepik)
3 स्टार, 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्समध्ये नेमका काय फरक असतो? जाणून घ्या
स्टार रेटिंगनुसार ग्राहक हॉटेल्सची निवड करतात. जितके कमी स्टार तितक्या हॉटेल सुविधा कमी, हे सर्वांना माहित आहे. पण हॉटेल्सना हे स्टार कोण देत, ते कसे ठरवले जातात याबद्दल जाणून घेऊ…
Web Title: What is the difference between 3 and 5 star and 7 star hotels how and who decides their rating know read details sjr