-   दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी जागतिक वडापाव दिवस साजरा केला जातो. 
-  अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव आहे. 
-  जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. 
-  १. आराम वडापाव 
 विशेष – बटाट्याची पांढरी भाजी
 कुठे – आराम उपहारगृह (स्थापना १९३९), मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनसमोर
-  २. अशोक वडापाव किंवा किर्ती कॉलेज वडापाव (१९८३ पासून) 
 विशेष – चटणी आणि वडापावबरोबर दिला जाणार चुरा
 कुठे – किर्ती कॉलेजजवळ, दादर (पूर्व)
-  ३. आनंद वडापाव 
 विशेष – मेयो वडापाव, चीज वडापाव
 कुठे – मिठीभाई कॉलेज जवळ, विलेपार्ले (पश्चिम)
-  ४. आशा पारेख रुग्णालयासमोरील वडापाव 
 विशेष – आलं, पुदीना आणि पिवळी चटणी (येथे भजीही उत्तम मिळतात)
 कुठे – आशा पारेख रुग्णालयासमोर, सांताक्रुज (पश्चिम)
-  ५. पार्लेश्वर वडापाव (समर्थ वडापाव) 
 विशेष – हिरवी चटणी (येथील सामोसा तसेच भजीपाव उत्तम आहे)
 कुठे – प्रेम शॉपिंग सेंटर, नेहरु रोड, नौपाडा, विलेपार्ले (पश्चिम)
-  ६. अशोक साटम वडापाव (सीटीओ वडापाव) 
 विशेष – कोथिंबीर, कडीपत्ता आणि आल्याच्या मिश्रणात तळलेले मिरची
 कुठे – महात्मा गांधी रोड, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसजवळ, आझाद मैदान, फोर्ट परिसर (मुंबई)
-  ७. एलफिस्टन रोड स्टेशनचा वडापाव 
 विशेष – पुदिना आणि चिंचेची चटणी
 कुठे – एलफिस्टन रोड रेल्वे स्टेशनबाहेर, मुंबई
-  ८. ग्रज्युएट वडापाव, भायखळा 
 विशेष – वेगवेगळ्या प्रकराच्या चटणी
 कुठे – भायखळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर, भायखळा (पश्चिम)
-  ९. मंगेश वडापाव (बोरिवली) 
 विशेष – वड्याचा कुरकुरीतपणा (येथील सामोसाही उत्तम आहे)
 कुठे – लक्ष्मी भूवन, ठाकूर शॉपिंग मॉलच्यासमोर, बोरिवली (पश्चिम)
-  १०. आशा पारेख रुग्णालयासमोरील वडापाव 
 विशेष – आलं, पुदीना आणि पिवळी चटणी (येथे भजीही उत्तम मिळतात)
 कुठे – आशा पारेख रुग्णालयासमोर, सांताक्रुज (पश्चिम)
-  ११. भाऊचा वडापाव 
 विशेष: आलं आणि नारळाची चटणी
 कुठे: पाटील भवन, एन. एस. रोड, स्टेशन रोड मुलुंड (पश्चिम)
-  १२. गजानन वडापाव ( स्थापना १९७८) 
 विशेष – पिवळ्या रंगाची चटणी
 कुठे – भगवती शाळेजवळ, विष्णू नगर, ठाणे
-  १३. मसाला वडापाव 
 विशेष – पावाला लावण्यात येणारा मसाला
 कुठे – कालिदास नाट्यगृहाजवळ, मुलुंड (पश्चिम)
-  १४. ठाकूर वडापाव, डोंबिवली 
 विशेष – मक्याचा चिवडा, कांदा आणि कोबी
 कुठे – आदित्य हॉलच्या समोर, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व)
-  १५. जगदीश बुक डेपोजवळचा वडापाव 
 विशेष – वड्याचा कुरकुरीतपणा
 कुठे – जगदीश बुक डेपोच्या बाजूला, अलोक हॉटेलच्या पुढे, ठाणे (पश्चिम)
-  आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels आणि सोशल मीडिया) 
World Vada Pav Day 2023: मुंबईतील ‘हे’ प्रसिद्ध वडापाव तुम्ही खाल्ले आहेत का?
आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे.
Web Title: World vada pav day 2023 street food best in mumbai and thane city information photos sdn