-
४ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने क्रिकेटपटू शिखर धवनला त्याची पत्नी आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटामागे आयशा मुखर्जीने धवनचा केलेला मानसिक छळ हे कारण न्यायालयाने नमूद केले.
-
शिखर व्यतिरिक्त असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. चला जाणून घेऊया त्या क्रिकेटपटूंची नावे ज्यांना घटस्फोटाचा त्रास सहन करावा लागला आहे.
-
मोहम्मद अझरुद्दीनने १९८७ मध्ये नौरीनशी अरेंज मॅरेज केले होते. विवाहित असूनही अझरुद्दीन बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी तो दोन मुलांचा पिता होता. अझरुद्दीनने १९९६ मध्ये संगीताशी लग्न करण्यासाठी नौरीनला घटस्फोट दिला. पण संगीताबरोबर क्रिकेटरचे लग्नही फार काळ टिकले नाही आणि २०१० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. (स्रोत: मोहम्मद अझरुद्दीन/फेसबुक)
-
दिनेश कार्तिकने २००७ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारासोबत लग्न केले. पण लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर २०१५ मध्ये दिनेशने भारताची स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलसोबत दुसरे लग्न केले. (स्रोत: दिनेश कार्तिक/फेसबुक)
-
जवागल श्रीनाथ
जवागल श्रीनाथ यांनी १९९९ मध्ये ज्योत्स्नाशी लग्न केले. पण पत्रकार माधवी पत्रावलीशी लग्न करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २००८ मध्ये जवागलने माधवीशी दुसरे लग्न केले. (स्रोत: जवागल श्रीनाथ/फेसबुक) -
विनोद कांबळी
विनोद कांबळीने १९९८ मध्ये नोएला लुईसशी पहिले लग्न केले. विवाहित असतानाच तो अँड्रिया हेविट नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर विनोदने अँड्रियासोबत दुसरे लग्न केले. (स्रोत: विनोद कांबळी/फेसबुक) -
ब्रेट ली
केवळ भारतीय खेळाडूच नाही तर क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना घटस्फोटाचा सामना करावा लागला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीच्या नावाचाही समावेश आहे. ब्रेट लीने 2006 मध्ये एलिझाबेथ कॅम्पशी लग्न केले. पण 2008 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर 2014 मध्ये त्याने लाना अँडरसनसोबत लग्न केले. (स्रोत: ब्रेट ली/फेसबुक) -
सनथ जयसूर्या
श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने 1998 मध्ये सुमुधु करुणानायके नावाच्या महिलेशी लग्न केले. पण लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर सनथने सन 2000 मध्ये सँड्राशी लग्न केले. पण त्यांचे लग्नही फार काळ टिकले नाही आणि 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. (स्रोत: सनथ जयसूर्या/फेसबुक) -
मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने 2012 मध्ये त्याची मैत्रीण कायलीसोबत लग्न केले. पण लग्नाच्या 8 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. दोघांना चार वर्षांची मुलगीही आहे. (स्रोत: मायकेल क्लार्क/फेसबुक)
शिखर धवनच नाही तर ‘या’ क्रिकेटपटूंनीही घटस्फोटामुळे सहन केला त्रास! अभिनेत्रीशीही जोडलं होतं नाव
Shikhar Dhawan Divorce Case: शिखर व्यतिरिक्त असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. ही यादी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते.
Web Title: Shikhar dhawan not a only victim these cricketers have also been through major problem while getting divorces dinesh kartik story svs