-
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून गुजरातमधील कच्छमधील धोर्डो या छोट्याशा गावाची निवड केली आहे. (स्रोत: @tourismgoi/twitter)
-
जागतिक पर्यटन संघटनेने गुजरातच्या या गावाला जगातील ५४ गावांमध्ये स्थान दिले आहे. (स्रोत: @tourismgoi/twitter)
-
हे गाव भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची एकूण लोकसंख्या ६२० आहे (स्रोत: @tourismgoi/twitter)
-
रण उत्सवामुळे या गावाला ओळख मिळाली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने हा उत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात पर्यटकांची मोठी गर्दी असते. (स्रोत: @tourismgoi/twitter)
-
रण उत्सवाच्या निमित्ताने या गावात अनेक घडामोडी घडल्या असून त्यामुळे या गावाने गुजरातच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. (स्रोत: @tourismgoi/twitter)
-
या गावाचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी आजही पारंपरिक गोल घरे पाहायला मिळतात. लाकूड आणि मातीच्या साहाय्याने ही गोल घरे बनवली जातात. (स्रोत: @tourismgoi/twitter)
-
हे ठिकाण पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. रण उत्सवाव्यतिरिक्त, पर्यटक येथे वाळूवर फेरफटका मारण्यासाठी, उंटांवर स्वारी करण्यासाठी आणि स्थानिक कला आणि हस्तकला खरेदी करण्यासाठी येतात. (स्रोत: @tourismgoi/twitter)
-
धोर्डो गावात हस्तकला आणि स्थापत्यकलेच्या अनेक सुंदर कलाकृती, कपडे, दागिने आहेत जे तुम्ही देखील खरेदी करू शकता. (स्रोत: @tourismgoi/twitter)
‘सर्वोत्तम पर्यटन गाव’ म्हणून गुजरातच्या धोर्डोने मारली बाजी; पाहा काय आहे येथे खास?
गुजरातमधील धोर्डो गावाची UNWTO द्वारे सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. या गावाची लोकसंख्या ६००च्या आसपास आहे. रण उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
Web Title: Dhordo in gujarat honored by unwto as best tourism village see beautiful pictures jshd import snk