• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. wagh bakri tea owner death know how parag desai tea brand got name wagh bakri jshd import vrd

…म्हणूनच पराग देसाईंच्या ब्रँडला ‘वाघ बकरी चहा’ नाव पडले

वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर रस्त्यावरच्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली, त्यानंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. १९३४ मध्ये सुरू झालेला वाघ बकरी चहा आज भारतातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

October 25, 2023 13:57 IST
Follow Us
  • Wagh Bakri Tea
    1/7

    वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पराग १५ ऑक्टोबरला मॉर्निंग वॉकला निघाले असताना रस्त्यावरील कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांपासून वाचण्यासाठी ते पळत असताना तोल जाऊन घसरून पडले आणि त्यामुळे त्ंयाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ब्रेन हॅमरेज झाला. यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वयाच्या ४९ व्या वर्षी पराग यांनी २२ ऑक्टोबरला संध्याकाळी जगाचा निरोप घेतला.

  • 2/7

    पराग देसाई वाघ बकरी चहाची विक्री, विपणन आणि निर्यात पाहत असे. पराग देसाई १९९५ मध्ये या कंपनीत रुजू झाले. त्यावेळी या कंपनीची उलाढाल कमी होती. (फोटो स्रोत: वाघ बकरी/यूट्यूब)

  • 3/7

    पण आज वार्षिक उलाढाल २ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. या कंपनीचा व्यवसाय देशातील २४ राज्यांमध्ये पसरलेला आहे. याशिवाय वाघ बकरी चहा जगातील ६० देशांमध्ये निर्यात केला जातो. (स्रोत: waghbakritea.official/instagram)

  • 4/7

    पराग देसाई यांचे कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून या चहा व्यवसायाशी जोडलेले आहे. या कंपनीचे संस्थापक त्यांचे आजोबा म्हणजेच आजोबांचे वडील नारनदास देसाई आहेत. (फोटो स्रोत: वाघबकरी/यूट्यूब)

  • 5/7

    नारनदास देसाई १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नारनदास दक्षिण आफ्रिकेतील ५०० एकर चहाच्या मळ्याचे मालक होते. त्यांनी तेथे २० वर्षे घालवली आणि चहाच्या लागवडीपासून विक्रीपर्यंत सर्व काही केले. पण तिथे त्याला वांशिक भेदभावाला बळी पडावे लागले, त्यानंतर ते भारतात आले. (स्रोत: waghbakritea.official/instagram)

  • 6/7

    आपल्या चहा व्यवसायाच्या अनुभवावर आधारित नारनदास यांनी अहमदाबादमध्ये गुजरात टी डेपोची स्थापना केली. काही वर्षांतच ते गुजरातमधील सर्वात मोठे चहा उत्पादक बनले आणि १९३४ मध्ये वाघ बकरी चहाचा ब्रँड सुरू केला. (फोटो स्रोत: वाघबकरी/यूट्यूब)

  • 7/7

    चहाच्या नावामागे एक मेसेज दडलेला आहे. हे नाव सामाजिक समतेचा संदेश देते. गुजराती भाषेत वाघाला वाघ आणि शेळीला बकरी म्हणतात. या नावाचा उद्देश उच्च वर्ग आणि खालच्या वर्गातील लोक एकत्र चहा पिऊ शकतात हे दाखवणे आहे. चहा या नावाच्या माध्यमातून उच्च-नीच हा भेदभाव नष्ट करण्याचा संदेश देण्यात आला आहे. (स्रोत: waghbakritea.official/instagram)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Wagh bakri tea owner death know how parag desai tea brand got name wagh bakri jshd import vrd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.