-
उत्तरकाशीतील सिल्कयारा बोगद्या दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांची १७ दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबरपासून कामगारांचे कुटुंबीय त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असताना दुसरीकडे बचाव पथक कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. चला या मिशनच्या नायकांवर एक नजर टाकूया: (Photo-PTI)
-
अरनॉल्ड डिक्स – या ऑपरेशनमध्ये अर्नोल्डची मोठी भूमिका होती. अरनॉल्ड डिक्स हे जिनिव्हास्थित इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत आणि ते या कामासाठी प्रसिद्ध आहेत. डिक्स केवळ भूमिगत बांधकामाशी संबंधित जोखमींबद्दल सल्ला देत नाहीत, तर ते त्यात माहिर आहेत. (Photo-ANI)
-
क्रिस कूपर – क्रिस कूपर हे मायक्रो-टनेलिंग तज्ञ आहेत. त्यांना या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी हे बचाव अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
-
नीरज खैरवाल – नीरज खैरवाल हे उत्तराखंड केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना या मिशनचे नोडल ऑफिसर बनवण्यात आले. ते या मिशनशी संबंधित प्रत्येक अपडेट सीएमओ आणि पीएमओला पाठवत होते आणि मिशनमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. (Express photo by Chitral Khambhati)
-
सय्यद अता हसनैन – भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल, सय्यद अता हसनैन हे या मिशनमध्ये NDMA चे नेते होते. या मिशनमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. (Source: Twitter/@atahasnain53)
-
मुन्ना कुरेशी – मुन्ना कुरेशी हा रॅट मायनर्स टीमचा लीडर होता. जिथे मोठी आधुनिक यंत्रे निकामी झाली, तिथे मुन्ना आणि त्याची टीम कामी आली. (PC: ANI)
-
१२ नोव्हेंबर रोजी सिल्क्यरा येथे निर्माणाधीन बोगद्यात कोसळल्याने ४१ मजूर अडकले होते. तेव्हापासून त्याच्या बचावासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्यात आली. (Source: Express photo by Chitral Khambhati)
-
एनडीआरएफ, एसडीआरएफ, हवाई दलासह विविध यंत्रणांचे शेकडो बचाव कर्मचारी या बचाव मोहिमेचे नायक होते. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. (PTI Photo)
४१ मजुरांना वाचवणाऱ्या ‘या’ ५ ‘नायकां’ची देशभरात चर्चा, जाणून घ्या हे ‘देवदूत’ आहेत तरी कोण?
Uttarakhand Tunnel Rescue Operation: १२ नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग खचल्याने ४१ मजूर अडकले होते. आता बोगद्यातील मजूर सुखरुप बाहेर आले आहेत.
Web Title: Uttarkashi tunnel rescue mission rat miners to arnold dix know about thye real heroes of this mission jshd import pdb