• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pune based kinetic green has launched the new zulu electric scooter in india pdb

बाकी कंपन्यांची होणार सुट्टी! मुंबईत दाखल झाली ६ रंग पर्यायांसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत फक्त…

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांसाठी एक नवी स्कूटर दाखल झाली आहे.

Updated: December 23, 2023 14:25 IST
Follow Us
  • भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे बाजारपेठेत कंपन्या नवनवे वाहन सादर करत आहेत.
    1/12

    भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे बाजारपेठेत कंपन्या नवनवे वाहन सादर करत आहेत.

  • 2/12

    आता कायनेटिक ग्रीन या भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने मुंबईतील एका कार्यक्रमात आपली नवीन मेड इन इंडिया इलेक्ट्रिक स्कूटर, ‘Kinetic Green Zulu’ सादर केली आहे.

  • 3/12

    कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ई-स्कूटरला उर्जा देण्यासाठी २.२७ kWh ची लिथियम-आयन बॅटरी स्थापित करण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर १०४ किमी धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

  • 4/12

    इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन ९३ किलोग्रॅम असून ती १५० किलोपर्यंत वजन उचलू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी ६० किमी आहे.

  • 5/12

    या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ऑटो कट चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, साइड स्टँड सेन्सर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, अंडरसीट स्टोरेज लायटिंग, एलईडी डीआरएल यांसारखी फीचर्स आहेत.

  • 6/12

    कंपनीने सहा रंग पर्यायासह ही स्कूटर लाँच केली आहे. क्लाउड ग्रे, एफबी ब्लू, पिक्सेल व्हाईट, ब्लॅक एक्स, इन्स्टा ऑरेंज आणि यूट्युब रेड अशा रंग पर्यामध्ये ही स्कूटर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

  • 7/12

    Zulu EV स्कूटरचे डिझाईन स्टायलिश बनवण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला ऍप्रॉन-माउंट एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे. एलईडी हेडलॅम्प DRL हँडलबार स्टॉकच्या वर आहे. स्कूटरला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.

  • 8/12

    Kinetic Green Zulu EV स्कूटरची लांबी १,८३० मिमी, रुंदी ७१५ मिमी आणि उंची १,१३५ मिमी देण्यात आली आहे.

  • 9/12

    स्कूटरमध्ये १,३६० मिमी व्हीलबेस आणि १६० मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग करण्यासाठी पाच तास लागतात.

  • 10/12

    कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक केवळ ४९९ रुपयांच्या किमतीत ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात.

  • 11/12

    या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९४,९९० (एक्स-शोरूम, मुंबई) रुपये आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरवर पाच वर्षांची वॉरंटी देखील मिळते.

  • 12/12

    नवीन ई-स्कूटर, ZULU आता देशभरातील सर्व Kinetic Green डीलरशिपवर आणि Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – kineticgreenvehicles.com)

TOPICS
इलेक्ट्रिकElectricइलेक्ट्रिक स्कूटरElectric ScooterऑटोAutoऑटो न्यूजAuto News

Web Title: Pune based kinetic green has launched the new zulu electric scooter in india pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.