-
देशभरात एका बाजूला करोनाचा नवीन उपप्रकार जेएन.१ ने बाधित रुग्ण आढळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दररोज शेकडो नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. (Express Photo by Tashi Tobgyal)
-
गेल्या २४ तासांत देशात कोव्हिड-१९ चे ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
देशातील करोनाबाधितांची संख्या आता ४.५० कोटी (४,५०,०७,२०२१) वर गेली आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
केरळमध्ये एका मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
करोनातून बरे झालेल्यांची टक्केवारी ९८.८१ टक्के इतकी आहे. आतापर्यंत देशभरात ४,४४,७०,८८७ लोकांनी करोनावर मात केली आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
गुरुवारपर्यंत देशात करोनाचा उप-प्रकार JN.1 चे २२ रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी २१ रुग्ण गोव्यातील आहेत. (Express Photo by Amit Mehra)
-
केरळमध्ये गेल्या २४ तासांत २६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
कर्नाटक सरकारने कोव्हिड व्यवस्थापनासाठी राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय कॅबिनेट उपसमिती स्थापन केली. (Express Photo by Tashi Tobgyal)
-
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत कोव्हिडवरील लसीचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत. (Express Photo by Tashi Tobgyal)
भारतात एका दिवसात आढळले ६५६ करोनाबाधित रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ३७४२ वर
काही महिन्यांपूर्वी देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. त्यामुळे भारताने सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
Web Title: India reports 656 new covid 19 cases 3742 active patients iehd import asc