• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. these 7 countries have unique traditions of celebrating christmas jshd import

Merry Christmas 2023: ‘या’ ७ देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्याच्या आहेत वेगळ्या अन् अनोख्या परंपरा

Christmas 2023 : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात, ख्रिसमस ट्री सजवतात आणि प्रार्थना करतात. मात्र सर्वत्र या सणाशी संबंधित विविध परंपरा आहेत. यातील काही परंपरा खूप अनोख्या आहेत.

December 25, 2023 11:19 IST
Follow Us
  • Unique traditions of celebrating Christmas
    1/8

    दरवर्षी 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, सर्वत्र या सणाशी संबंधित विविध परंपरा आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला जगभरात ख्रिसमसनिमित्त साजऱ्या होणाऱ्या अनोख्.ा परंपरांबद्दल सांगणार आहोत.

  • 2/8

    नॉर्वे
    नाताळच्या निमित्ताने नॉर्वेजियन लोक त्यांच्या घरात झाडू लपवतात. तिथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, ख्रिसमसच्या दिवशी वाईट आत्मा आणि चेटकिणी उडण्यासाठी झाडूच्या शोधात येतात. दुष्ट आत्म्यांना पृथ्वीवर परत येण्यापासून रोखण्यासाठी ते झाडू लपवतात.

  • 3/8

    आइसलँड
    आइसलँडमध्ये ख्रिसमसच्या एक दिवस आधी, तिथली मुले त्यांचे बूट सुंदरपणे सजवतात, खिडकीजवळ ठेवतात आणि झोपायला जातात. ज्या मुलांनी वर्षभर चांगले काम केले आहे त्यांचे पालक त्यांचे शूज कँडीने भरून आश्चर्यचकित करतात. त्याच बरोबर वर्षभर वाईट वागणाऱ्या मुलांना नवीन वर्षात शूजमध्ये सडलेल्या बटाटे भरून देतात आणि चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

  • 4/8

    कॅनडा
    कॅनडामध्ये मुले ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजला पत्रे पाठवतात. सांताक्लॉजचे घर कॅनडात आहे, त्यामुळे मुले त्याला पोस्टाद्वारे पत्र लिहितात आणि नंतर त्याच्या उत्तराची वाट पाहत असल्याचे सांगितले जाते.

  • 5/8

    युक्रेन
    ख्रिसमसच्या निमित्ताने युक्रेनमधील लोक सजावटीच्या वस्तूंऐवजी ख्रिसमसच्या झाडाला कोळ्याच्या जाळ्यांनी सजवतात. खरं तर, त्यांचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारे झाडाची सजावट केल्याने त्यांच्या घरात आणि जीवनात आनंद आणि चांगल्या गोष्टी येतील.

  • 6/8

    पोलंड
    पोलंडमधील मुले ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आकाशातील पहिला तारा पाहण्यासाठी प्रतीक्षा करतात. तारा पाहिल्यानंतर ते त्यांच्या भेटवस्तू उघडतात. जेव्हा आकाशात पहिला तारा दिसतो तेव्हा त्याला मार्गदर्शक तारा म्हणतात, याचा अर्थ असा की, सर्व भेटवस्तू आता उघडल्या जाऊ शकतात.

  • 7/8

    फिनलंड
    फिनलंडमध्ये ख्रिसमसच्या दिवशी सकाळी पुडिंग खाण्याची परंपरा आहे. सकाळी, लोक तांदूळ आणि दुधापासून बनवलेले पुडिंग दालचिनी, दूध किंवा लोणीसह खातात. या पुडिंगमध्ये बदाम लपलेले असतात आणि ज्याला बदाम आधी सापडतो तो जिंकतो.

  • 8/8

    पोर्तुगाल
    पोर्तुगालमध्ये ख्रिसमसच्या दिवशी पहाटे कॉन्सोडा नावाची मेजवानी असते. त्यात, लोक मरण पावलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी टेबलवर अन्न ठेवतात.
    (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
ख्रिसमस डेChristmas Dayख्रिसमस सेलिब्रेशनChristmas Celebrationsख्रिसमस २०२४Christmas 2023मराठी बातम्याMarathi Newsमेरी ख्रिसमसMerry Christmas

Web Title: These 7 countries have unique traditions of celebrating christmas jshd import

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.