-
मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामाची मूर्ती ही अयोध्येतील राम मंदिरात ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय सकाळीच समोर आला. त्यानंतर अरुण योगीराज यांचं नाव चर्चेत आहे. पाच पिढ्यांचा मूर्तीकलेचा वारसा लाभलेला हा कलावंत आहे. (सर्व फोटो सौजन्य-अरुण योगीराज, X अकाऊंट)
-
अरुण योगीराज यांनी त्यांच्या X अकाऊंटवर त्यांनी घडवलेल्या अनेक मूर्तींचे, शिल्पांचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
मूर्तीत जिवंतपणा आणणं ही अरुण योगीराज यांच्या कामाची खास ओळख आहे. त्यांनी घडवलेल्या मूर्ती याचीच साक्ष पटवत आहेत.
-
आदी शंकराचार्य यांच्या मूर्तीला आकार देताना अरुण योगीराज. अरुण योगीराज हे मैसूरचे आहेत. त्यांच्या घरात पाच पिढ्यांच्या मूर्तीकलेचा वारसा आहे.
-
आत्तापर्यंत अरुण योगीराज यांनी विविध आणि वैविध्यपूर्ण मूर्ती आपल्या हाताने साकारल्या आहेत. मूर्तीकलेचं बाळकडू त्यांना आपल्या घरातच मिळालं.
-
अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून त्यांची गणना होते.
-
अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्तीकलेची आवड होती. त्यांनी MBA केलं. त्यानंतर ते एका खासगी कंपनीत कामही करत होते. मात्र मूर्तीकला ते विसरले नाहीत. २००८ मध्ये नोकरी सोडून त्यांनी मूर्ती साकारण्याच्या आपल्या पिढीजात व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच ते लोकप्रिय मूर्तीकार झाले.
-
अरुण योगीराज यांनी साकरलेल्या मूर्ती या वैशिष्ट्यपूर्ण आणि खास असतात.
-
नंदीच्या मूर्तीला आकार देताना अरुण योगीराज
-
अरुण योगीराज यांनी साकारलेली गणपती बाप्पाची लोभस आणि सुंदर मूर्ती
-
मूर्तीमध्ये देवत्वाचे भाव दिसत नाहीत तोपर्यंत अरुण योगीराज त्या मूर्तीवर काम करत असतात असं त्यांच्या पत्नीने सांगितलं.
-
अरुण योगीराज यांनी साकरलेली शिल्पं आणि मूर्ती या त्यांच्या कलेचा वारसा सांगत दिमाखात उभी आहेत यात काही शंकाच नाही.
न्या.गवईंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलले मोठे पाऊल….