Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. india horrible record becomes third country with maximum air pollution with almost 42 out of top 50 cities highly polluted check list svs

जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारताचा नंबर तिसरा; ५० पैकी ४२ शहरं आपली, फक्त एका वर्षात काय बदललं, पाहा यादी

Top Air Polluted Countries In World: १३४ देशांमधील वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवरून गोळा करण्यात आलेल्या माहितीनुसार भारताने अत्यंत लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे.

March 19, 2024 20:00 IST
Follow Us
  • India Horrible Record Becomes Third Country With Maximum Air Pollution with Almost 42 Out Of Top 50 Cities Highly Polluted Check list
    1/9

    स्विस एअर क्वालिटी मॉनिटरिंग बॉडी, IQAir ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारत २०२३ मध्ये १३४ देशांपैकी सर्वात खराब हवेचा दर्जा असणारा तिसरा देश ठरला आहे.

  • 2/9

    २०२३ मध्ये जगातील टॉप 5 सर्वाधिक प्रदूषित देश: बांगलादेश, पाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान आणि बुर्किना फासो

  • 3/9

    ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२३’ नुसार, देशातील हवेत प्रति घनमीटरमध्ये सरासरी ५४.४ मायक्रोग्रॅम दूषित घटक आढळून आले आहेत. आपल्यापुढे केवळ बांगलादेश (७९.९ मायक्रोग्रॅम दूषित घटक/ प्रति घन मीटर) व पाकिस्तान (७३.७ मायक्रोग्रॅम दूषित घटक/ प्रति घनमीटर) हे दोनच देश आहेत

  • 4/9

    २०२२ मध्ये, सरासरी ५३.३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर दूषित घटक असलेल्या हवेच्या गुणवत्तेनुसार भारत आठवा सर्वाधिक प्रदूषित देश म्हणून क्रमवारीत आला होता. तर आता वर्षभरातच आठव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर येऊन भारताने लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे.

  • 5/9

    प्राप्त माहितीनुसार या अहवालामध्ये जगातील सर्वात प्रदूषित ५० शहरांची यादी होती. ज्यात भारतातील ४२ शहरे समाविष्ट होती. २०२३ मध्ये बेगुसराय हे सर्वात प्रदूषित महानगर क्षेत्र होते, त्यानंतर गुवाहाटी आणि दिल्ली ही सर्वाधिक प्रदूषित शहरे होती

  • 6/9

    बिहारच्या बेगुसरायमध्ये गेल्या वर्षी दूषित घटकांची आकडेवारी सरासरी ११८.९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी होती, आश्चर्य म्हणजे याच शहरातील २०२२ मधील हवेतील दूषित घटकांचे प्रमाण हे सरासरी १९.७ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकेच होते.

  • 7/9

    २०२२ आणि २०२३ दरम्यान गुवाहाटीमधील प्रदूषण सुद्धा ५१ वरून १०५.४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पर्यंत दुप्पट झाले होते. विशेष म्हणजे वायू प्रदूषणामुळे नेहमी चर्चेत येणाऱ्या दिल्लीतील प्रदूषणाची वाढ ही त्या तुलनेत कमी आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये दिल्लीत ८९.१ वरून ९२.७ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकीच वाढ झाली होती

  • 8/9

    दरम्यान, जगातील पहिल्या दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ९ शहरे भारतातील आहेत. तर, सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीतील टॉप ५० शहरांमध्ये या शहरांचा सुद्धा समावेश आहे

  • 9/9

    IQAir च्या अहवालातील डेटा हा १३४ देशांमधील ७,८१२ ठिकाणांवरील ३०,००० हून अधिक वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवरून गोळा करण्यात आला आहे.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsवायू प्रदूषणAir Pollution

Web Title: India horrible record becomes third country with maximum air pollution with almost 42 out of top 50 cities highly polluted check list svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.