-
गुरूवारी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे ॲनिमल, क्लायमेट अँड हेल्थ सेव्ह इंडिया संस्थेचे स्वयंसेवक अनोख्या ढंगात आपलं मत व्यक्त करण्यासाठी पोहोचले होते. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
पृथ्वीचे प्रतीक म्हणून निळ्या रंगात रंगलेले हे स्वयंसेवक मुंबईच्या रस्त्यावर उतरून मुंबईकरांना पाणी व प्राणी वाचवण्यासाठी उपदेश करताना दिसले होते.(फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
स्वयंसेवकांनी आपले केस, चेहरा, हात- पाय निळ्या रंगात रंगवून हातात पाणी वाचवा व प्राणी वाचवा असं म्हणणारे बोर्ड धरले होते. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
एका तराजूच्या पोस्टरवर त्यांनी १ किलो मांस हे २० लिटर पाण्याइतके आहे असे दाखवत दोघांचेही जतन आपण करायला हवे असं मत व्यक्त केलं. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मरीन ड्राइव्ह भागात दुपारच्या कडक उन्हात हे स्वयंसेवक पाणी वाचवण्याचे धडे देत असल्याचे पाहून काही अन्य लोक सुद्धा साध्या कपड्यात त्यांना साथ देण्यासाठी पुढे आले होते. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
काही पोस्टर्सवर पाणी वाचवण्याच्या सल्ल्यासह तुम्हीही व्हीगन व्हा असे लिहिले होते. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
या उपक्रमाचे औचित्य म्हणजे आज २२ मार्चला जगभरात जागतिक जल दिन साजरा केला जातो. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
११९२ मध्ये, रिओ दि जानेरो येथील पर्यावरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत अजेंडा २१ अंतर्गत जागतिक जल दिनाचा पहिला औपचारिक प्रस्ताव मांडला गेला होता. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर १९९२ मध्ये हा ठराव स्वीकारला ज्यानुसार २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून घोषित करण्यात आला.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
उन्हाच्या झळा वाढत असताना व येत्या महिन्यांमध्ये पाणी कपातीचे सावट डोक्यावर असताना, तुम्हाला या स्वयंसेवकांनी दिलेला सल्ला किती योग्य वाटतोय हे कमेंट करून नक्की कळवा. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मुंबई: मरीन ड्राइव्हवर अवतरलेली पृथ्वी पाहिलीत का? त्यांचं ‘हे’ म्हणणं तुम्हाला किती पटतंय, Photos बघून सांगा
World Water Day 2024: आज २२ मार्चला जगभरात जागतिक जल दिन साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबईतील मरीन ड्राइव्हवर दिसून आलेले हे कलाकार नेमकं काय म्हणतायत पाहूया..
Web Title: Mumbai news at marine drive jal devta and earth costume wearing social workers save water quotes on world water day svs