Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. seven reasons to ditch that glass of ice cold water during summer snk

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…

घशाचे आजार असलेल्यांसह सर्वांनाच थेट फ्रिजमधील थंड पाणी पिऊ नये असे सांगितले जाते. हे पाणी जितके थंड असेल तितके गंभीर परिणाम आरोग्यावर होतात.

May 5, 2024 20:16 IST
Follow Us
  • Seven reasons to ditch that glass of ice cold water during summer
    1/12

    शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण, उन्हाळ्यात तुम्ही अनेकदा फ्रिजमधील थंड पाणी पिऊन ती गरज पूर्ण करता का? घशाचे आजार असलेल्यांसह सर्वांनाच थेट फ्रिजमधील थंड पाणी पिऊ नये असे सांगितले जाते

  • 2/12

    “अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्यास शरीराच्या प्रणालीला विशेषत: पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे काही लोकांना क्षणिक वेदना किंवा पचनाची समस्या जाणवते. याशिवाय अतिथंड पाणी घशातील रक्तवाहिन्यांमध्ये तापुरता

  • 3/12

    अडथळा निर्माण करू शकतात, ज्यामुळे घसा दुखणे किंवा घसा खवखवणे असा त्रास जाणवू शकतो”, असे गुरुग्राम येथील मरेंगो एशिया हॉस्पिटलचे अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मोहन कुमार सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

  • 4/12

    उन्हाळ्याच्या हंगामात बर्फाचे थंड पाणी न पिण्याची सात कारणे
    घसा खवखवणे
    अत्यंत थंड पाण्यामुळे घशामध्ये खवखव जाणवू शकते आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या घशाच्या समस्या, जसे की घसा दुखणे किंवा सूज येणे वाढू शकते. “याव्यतिरिक्त बर्फाचे पाणी पिणे, विशेषत: जेवणानंतर, घशातील श्लेष्मा वाढू शकतो; ज्यामुळे सर्दी, फ्लू किंवा ॲलर्जीसारख्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणे आणखी बिघडू शकतात”, असे गुड़गांव येथील आर्टेमिस लाइट ८२ए च्या पोषण सल्लागार याशिका दुआ ( Yashika Dua) यांनी द इंडियन एक्स्प्रेसबरोबर माहिती देताना सांगितले.

  • 5/12

    रक्तवाहिन्या संकुचित होणे
    थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात, ज्यामुळे घशातील रक्त प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे कोणत्याही संसर्गाच्या बाबतीत बरे होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. “यामुळे सूज येणे, क्रॅम्प येणे आणि अगदी बद्धकोष्ठता यासारखी अनेक लक्षणे उद्भवू शकतात. त्यामुळे चांगल्या पचनासाठी थंड पाणी पिणे टाळणे चांगले आहे”, असे अहमदाबादच्या अपोलो हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ विनिता सिंग राणा यांनी सांगितले.

  • 6/12

    स्नायूंवर ताण येणे
    “बर्फाच्या थंड पाण्यामुळे घशातील स्नायूंवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे घशाच्या रुग्णांना गिळणे अधिक कठीण आणि अस्वस्थता जाणवते. “त्यामुळे घसा खवखवणे, नाक बंद होणे आणि इतर श्वसन संक्रमणदेखील होऊ शकते”, असे याशिका दुआ यांनी सांगितले.

  • 7/12

    थंड पाण्यामुळे हृदयाची गती कमी होते “या परिणामाचे कारण दहाव्या क्रॅनियल मज्जातंतूच्या सक्रियतेला दिले जाते, ज्याला व्हॅगस मज्जातंतूदेखील म्हणतात. शरीराच्या स्वायत्त मज्जासंस्थेचा एक महत्त्वाचा घटक हृदयगती नियंत्रित करण्यासाठी जबाबदार आहे”, असे दुआ यांनी सांगितले.

  • 8/12

    “थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते”, असे राणा म्हणाले. ही परिस्थिती सायनस आणि मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांची समस्या आणखी वाढवू शकते”, असे राणा यांनी सांगितले.

  • 9/12

    पचनात अडथळा
    अत्यंत थंड पाणी किंवा शीतपेयांचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, पचनक्रिया विस्कळीत होतात. “थंड पाण्यामुळे पोट आकुंचन पावते, जेवल्यानंतर पचनक्रिया गुंतागुंतीची होते. पचनसंस्था थंड पाण्याच्या प्रभावाबाबत विशेषतः संवेदनशील असते, कारण ती पचनाच्या वेळी पोषक द्रव्ये शोषण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणते”, असे दुआ यांनी नमूद केले.

  • 10/12

    वजन नियंत्रणात अडथळा
    थंड पाणी शरीरात साठलेल्या फॅट्सचा वापर करण्यात अडथळा आणते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच थंडगार पाणी प्यायल्याने खाल्लेल्या पदार्थांमधील फॅट्स घट्ट होतात, त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास जेवणानंतर किमान ३० मिनिटे थंड पाण्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

  • 11/12

    दातांची संवेदनशीलता
    थंडगार पाण्याचे सेवन दात संवेदनशीलतेला कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे चघळणे आणि पाणी पिण्यात अडचणी निर्माण होतात. राणा सांगतात, “जेव्हा तुम्ही खूप थंड पाणी किंवा पदार्थाचे सेवन करता, तेव्हा ते तुमच्या दातांना मुलामा चढवून कमकुवत करू शकते, ज्यामुळे दातांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते.”
    “दातांच्या समस्या कमी करण्यासाठी खोलीच्या तापमानानुसार पाणी निवडण्याची शिफारस केली जाते”, असे दुआ यांनी सांगितले.

  • 12/12

    कोमट पाणी प्या
    “घशाच्या रुग्णांसाठी किंवा ज्यांना आधीच दात संवेदनशीलता आहे, त्यांच्यासाठी खोलीचे तापमान किंवा कोमट पाण्याची शिफारस केली जाते; कारण ते बरे होण्याच्या प्रक्रियेत मदत करते”, असे दुआ यांनी सांगितले.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Seven reasons to ditch that glass of ice cold water during summer snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.