Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. america former president donald trump came under gunfire shooter used ar 15 style rifle to commit assassination spl

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘या’ रायफलने करण्यात आला हल्ला; अमेरिकेत प्रसिद्ध असलेली ही बंदूक किती पावरफुल आहे? वाचा माहिती

Shooting at Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण थोडक्यात वाचले. एका शूटरने ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये त्यांच्या कानाला गोळी चाटून गेली. या हल्ल्यात हल्लेखोराने जी रायफल गन वापरली, ती अमेरिकन नागरिकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे.

July 15, 2024 13:51 IST
Follow Us
  • donald trump
    1/9

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे निवडणूक रॅलीत जीवघेणा हल्ला झाला. मात्र, या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. गोळी त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला चाटून गेली. (फोटो: रॉयटर्स)

  • 2/9

    ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सने हल्लेखोराला जागीच ठार केले. हल्लेखोर हा २० वर्षांचा तरुण होता. घटनास्थळावरून AR-१५–style रायफल जप्त करण्यात आली आहे. ही एक सेमी-ऑटोमैटिक रायफल आहे. (फोटो: पीटीआय)

  • 3/9

    याच रायफलने हल्लेखोराने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रॅलीवर गोळीबार केला होता. तो १२० मीटर अंतरावर असलेल्या एका कंपनीच्या छतावर उभा होता, तेथून त्याने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर नेम लावला. (फोटो: पीटीआय)

  • 4/9

    हल्ल्यात वापरल्या गेलेल्या रायफलबद्दल बोलायचे झाले तर, काही देशांच्या लष्करात ही रायफल वापरली जाते. या रायफलचा AR म्हणजे Arma Lite चांगला असल्याने अमेरिकन नागरिकांमध्ये ही अतिशय प्रसिद्ध रायफल आहे.

  • 5/9

    ही हलक्या वजनाची रायफल आहे. ही रायफल इतकी शक्तिशाली आहे की ती एका मिनिटात ६० राउंड फायर करू शकते. या रायफलच्या फायरिंगने एखाद्या व्यक्तीची छाती काहीच वेळात फाटू शकते. या रायफलची निर्मिती १९५६ साली करण्यात आली असून नवीन वर्जनमध्ये देखील टी उपलब्ध आहे.

  • 6/9

    सध्या, बहुतेक अमेरिकन शस्त्रास्त्र उत्पादक केवळ AR-१५ शैलीतील रायफल बनवतात. अमेरिकेत या रायफलचे डझनभर प्रकार उपलब्ध आहेत, ज्यांच्या किंमती भिन्न आहेत. यांची बॅरल 16 इंचांपेक्षा कमी असते. (फोटो: पीटीआय)

  • 7/9

    या रायफलला खांद्याचा सपोर्ट नसला तरी काही कंपन्या लांब पल्ल्याच्या शूटिंगसाठी खांद्याचा सपोर्ट असणाऱ्या रायफल्सही बनवतात. फोल्डिंग आणि नॉन-फोल्डिंग अशा दोन प्रकारात ही रायफल मिळते. (फोटो: रॉयटर्स)

  • 8/9


    अमेरिकेत अनेक हत्यांमध्ये वापरण्यात आलेली ही एकमेव बंदूक आहे. Mayors Against Illegal Guns या अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेतील ९३ पैकी १४’ सार्वजनिक गोळीबार हल्ल्यांमध्ये हीच रायफल वापरली गेली आहे. अमेरिकेत सार्वजनिक गोळीबार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मुख्य १० हत्यारांमध्ये या रायफलचा समावेश आहे. अशीही माहिती संस्थेने दिली आहे. (फोटो: ट्विटर)

  • 9/9

    हेही वाचा-

    PHOTOS : डोनाल्ड ट्रम्प किती श्रीमंत आहेत?, ‘इथे’ केलीय सर्वाधिक गुंतवणूक! वाचा माहित…

TOPICS
डोनाल्ड ट्रम्पDonald Trumpमराठी बातम्याMarathi News

Web Title: America former president donald trump came under gunfire shooter used ar 15 style rifle to commit assassination spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.