• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how to find lost retrieve uid or eid number when you lost aadhar card follow this easy steps to retrieve it easily asp

Lost Aadhaar Card: आधार कार्ड हरवल्यावर नक्की काय करायचं? परत कसं मिळवायचं? सोपी पद्धत जाणून घ्या

How to Retrieve Lost Aadhaar UID and EID Number : आपल्याकडून अनेकदा हे महत्त्वाचं कागदपत्र गहाळ होतं. मग एखादं महत्त्वाचं काम करायला जाताना ‘माझं आधार कार्ड कुठे आहे?’, असं विचारून घरात शोधाशोध सुरू होते…

August 9, 2024 21:11 IST
Follow Us
  • how to find lost Retrieve UID Or EID number when you lost aadhar card
    1/9

    सध्या आधार कार्ड प्रत्येक कामासाठी गरजेचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. (फोटो सौजन्य: @Financial Express)

  • 2/9

    =पण, आपल्याकडून अनेकदा हे महत्त्वाचं कागदपत्र हरवून जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    जर तुमचंही आधार कार्ड हरवलं असेल, तर आता घरबसल्या तुम्ही आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक सहज मिळवू शकता. ((फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    १. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या : सर्वप्रथम गूगल ओपन करा आणि ॲड्रेस बारमध्ये http://www.uidai.gov.in टाईप करा. नंतर तुमच्यासमोर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे अधिकृत संकेतस्थळ येईल. हे अधिकृत संकेतस्थळ आहे, जिथे तुम्ही तुमच्या आधार कार्डाविषयीची संबंधित माहिती मिळवू शकता. (फोटो सौजन्य: अधिकृत वेबसाईट / स्क्रिनशॉट)

  • 5/9

    २. रिट्रिव्ह लॉस्ट यूआयडी / ईआयडी : UIDAI अधिकृत संकेतस्थळाच्या होम पेजवर, ‘Retrieve Lost UID/EID’ हा पर्याय शोधा. हा पर्याय सहसा ‘आधार सेवा’ (Aadhaar Services) विभागात आढळतो. त्यावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्ही हरवलेलं आधार कार्ड पुन्हा मिळविण्याची प्रक्रिया सुरू करू शकता. (फोटो सौजन्य: @Indian Express)

  • 6/9

    ३. तुमची वैयक्तिक माहिती द्या : तुमची ओळख पटविण्यासाठी तुम्हाला काही वैयक्तिक माहिती देण्यास सांगितली जाईल. त्यामध्ये तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबरचा समावेश असेल. तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केला आहे, तोच तुमच्या ‘आधार’वर नोंदणीकृत आहे ना याची खात्री करून घ्या. कारण- या नंबरवर OTP (वन-टाइम पासवर्ड) पाठविला जाईल. (फोटो सौजन्य: @Indian Express)

  • 7/9

    ४. दोन पर्याय दिले जातील : तुम्हाला आधार कार्ड क्रमांक किंवा नावनोंदणी आयडीमध्ये नक्की काय रिट्रिव्ह करायचं आहे त्यावर क्लिक करा. जर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हवा असल्यास, ‘आधार क्रमांक‘ (यूआयडी) पर्याय निवडा. जर तुम्हाला नावनोंदणी क्रमांक हवा असल्यास ‘आधार नोंदणी क्रमांक (ईआयडी) हा पर्याय निवडा. (फोटो सौजन्य: @Indian Express)

  • 8/9

    ५. ‘ओटीपी पाठवा’वर क्लिक करा : ओटीपी पाठवा या बटणावर क्लिक करा. तुमच्या आधारबरोबर लिंक करण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला सहा अंकी ओटीपी पाठविला जाईल. संकेतस्थळावर दिलेल्या फील्डमध्ये हा ओटीपी टाका. OTP बरोबर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोडदेखील टाकावा लागेल. एकदा तुम्ही हा तपशील भरलात की, पुढे जाण्यासाठी ‘सबमिट करा’वर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Indian Express)

  • 9/9

    =६. आधार किंवा नोंदणी क्रमांक तुमच्यापर्यंत येईल : तुमच्या वैयक्तिक माहितीची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार किंवा नोंदणी क्रमांक पाठवला जाईल. या ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार हा क्रमांक वा नंबर तुम्ही दिलेल्या ईमेल पत्त्यावर किंवा मोबाइल क्रमांकावर पाठविला जाईल. (फोटो सौजन्य: Indian Express / @Freepik )

TOPICS
आधार कार्डAadhar CardटेकTechटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: How to find lost retrieve uid or eid number when you lost aadhar card follow this easy steps to retrieve it easily asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.