-
जन्माष्टमीचा सण देशभर साजरा केला जातो. जन्माष्टमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. जन्माष्टमीच्या रात्री भगवान कृष्णाच्या जन्माच्या वेळी, कृष्ण बाळाला पाळण्यामध्ये बसवले जाते. तसेच लोक श्रीकृष्णाचा वाढदिवस त्यांच्या पद्धतीने साजरा करतात. अनेकांनी केक कापून खोडकर नंदलालाचा वाढदिवसही साजरा करण्याची पद्धतही अवलंबली आहे. जर तुम्हालाही जन्माष्टमीला केक कापून भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करायचा असेल, तर तुम्हाला इथून केक डिझाइनची कल्पना येऊ शकते. (fluffycloud_bakery/Insta)
-
हा केक तुम्ही जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी कपू शकता. (capturingraw /Insta)
-
या केकची डिझाइन अतिशय साधी पण अप्रतिम आहे. जन्माष्टमीसाठी तुम्ही असे केक मागवू शकता. या केकवर लहान दही हंडीसोबत बासरी आणि मोराची पिसेही लावता येतात. (mintsrecipes/Insta)
-
बासरीसह या बटर केकची डिझाइनही अगदी सोपी आणि आकर्षक आहे. (creamydreamybakers/Insta)
-
तुम्ही जन्माष्टमीसाठी खास डिझाईन केलेला केक शोधत असाल, तर तुम्ही मोराचे पंख, बालक रूपातील कृष्ण, दही हंडी आणि बासरी थीम असलेला केक ऑर्डर करू शकता. (sugartwistbykruti /Insta)
-
हा खास हंडीच्या आकारात तयार केलेला केक जन्माष्टमीला कान्हासाठी मागवला जाऊ शकतो. (fluffycloud_bakery/Insta)
-
जर तुम्ही साध्या डिझाईनचा केक शोधत असाल तर तुम्ही हा मटकी स्टाइल केक देखील ऑर्डर करू शकता. (fluffycloud_bakery/Insta)
-
मटकी स्टाईलमध्ये मोराची पिसे, लोणी आणि बासरी थीम असलेल्या या केकचा आनंद जन्माष्टमीला घेता येईल. (fluffycloud_bakery/Insta)
-
तुम्ही जन्माष्टमीसाठी या दुमजली केकच्या डिझाइनची ऑर्डर देखील देऊ शकता. दहीहंडी सोबतच मोराची पिसे, बासरी आणि तुमची इच्छा असेल तर त्यावर काही खास लिहून देखील मिळू शकते. (craftybakes_ /Insta)
Krishna Janmashtami Cake Design: कृष्ण जन्माष्टमीला केक कापायचा आहे?, या खास डिझाइन्सची निवड तुम्ही करू शकता
Krishna Janmashtami Cake Design: जर तुम्हाला जन्माष्टमीनिमित्त गोपाळांसाठी केक ऑर्डर करायचा असेल, तर या काही डिझाइनची निवड तुम्ही करू शकता.
Web Title: Janmashtami cake design want to celebrate laddu gopal s birthday by cutting the cake you can get the design idea from here spl