• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 21 oldest inhabited cities of the world this indian city is also named in the list spl

Oldest Cities Of The World: हजारो वर्षांपूर्वी वसलेली जगातील सर्वात जुनी 21 शहरं कोणती?, भारतातील ‘या’ शहराचा समावेश!

21 oldest inhabited cities of the world: जगातील 21 सर्वात जुन्या असलेल्या शहरांची यादी समोर आली आहे ज्यामध्ये सर्वात टॉपवर असलेले शहर किती वर्षांपूर्वी वसले होते हे कळल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या यादीत एका भारतीय शहराच्या नावाचाही समावेश आहे.

August 26, 2024 17:04 IST
Follow Us
  • the world's oldest cities
    1/12

    जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. आज आपण त्या शहरांबद्दल जाणून घेणार आहोत जी जगातील सर्वात जुनी शहरं आहेत. या यादीत भारताचेही एक शहर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ही यादी आपल्या X खात्यावर शेअर केली आहे. ही शहरे यापेक्षाही जुनी किंवा अलीकडच्या काळातील असण्याची शक्यता आहे.

  • 2/12

    बेरूत: लेबनॉनचे सर्वात मोठे शहर आणि राजधानी, बेरूत 5,000 वर्षांपूर्वी वसले झाले.

  • 3/12

    गाजियांटेप: हे एक तुर्की शहर आहे जे 5,650 वर्षे जुने आहे.

  • 4/12

    प्लोवडिव्ह: हे बल्गेरियातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे, प्लोवडिव्ह 6,000 वर्षांपूर्वी वसले आहे.

  • 5/12

    फैयुम आणि सिदोन: लेबनॉनमधील सिदोन हे दुसरे शहर 6,000 वर्षे जुने आहे. इजिप्शियन शहर फय्युम हेही तितकेच जुने आहे.

  • 6/12

    सुसा: इराणमधील हे शहर 6,200 वर्षांपूर्वी वसले होते.

  • 7/12

    दमास्कस आणि अलेप्पो: ही दोन्ही शहरे सीरियामध्ये आहेत, जी 6,300 वर्षांपूर्वी वसली होती.

  • 8/12

    बायब्लॉस: लेबनॉनमधील चार शहरांचा जगातील सर्वात जुन्या शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बायब्लॉस हे जगातील तिसरे सर्वात जुने शहर आहे, येथील वस्ती 7,000 वर्षांपूर्वी वसलेली आहे.

  • 9/12

    जेरिको : पॅलेस्टाईनमधील जेरिको शहर या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार हे शहर 11,000 वर्षांपूर्वी वसले होते.

  • 10/12

    अर्गोस : ग्रीसमधील अर्गोस हे शहर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे शहर 7,000 वर्षांपूर्वी वसले होते.

  • 11/12

    भारतातील ज्या शहराचे नाव या यादीत समाविष्ट आहे ते वाराणसी आहे. या शहराची स्थापना 3000 वर्षांपूर्वी झाली.

  • 12/12

    याशिवाय 3,100 वर्षांपूर्वीचे स्पेनचे काडीझ शहर, 3,400 वर्षांपूर्वीचे ग्रीसचे थेबेस आणि सायप्रसचे लार्नाका शहर, 3,400 वर्षांपूर्वीचे ग्रीसचे अथेन्स शहर, 3,500 वर्षांपूर्वीचे अफगाणिस्तानचे बल्ख ही शहरेही आहेत. इराकमधील किर्कुक शहर 4,200 वर्षांपूर्वी, लेबनॉनमधील टायर शहर 4,750 वर्षांपूर्वी स्थायिक झाले आणि इस्रायलची राजधानी जेरुसलेम शहर 4,800 वर्षांपूर्वी वसले.

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: 21 oldest inhabited cities of the world this indian city is also named in the list spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.