• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bike servicing tips and why your bike needs regular servicing then you must follow this tricks asp

बाईकची पहिली सर्व्हिसिंग कधी करावी? ‘या’ ट्रिक्स ठेवा लक्षात; नव्‍या बाईकवर दूरचा प्रवास होईल सुखाचा

Bike Servicing Tips: बाईकच्या इंजिनाच्‍या दीर्घायुष्‍यासाठी सर्व्हिसिंग वेळेवर होणे खूप महत्त्‍वाचे आहे. नव्‍या बाईकवर सुरुवातीला इंजिनबरोबर त्‍याच्‍या इतर पार्ट्सवरदेखील जास्‍त दबाव पडत असतो…

August 26, 2024 21:10 IST
Follow Us
  • Bike Servicing Tips and Why your bike needs regular servicing then You Must Follow this tricks
    1/9

    बाईकच्या इंजिनाच्‍या दीर्घायुष्‍यासाठी सर्व्हिसिंग वेळेवर होणे खूप महत्त्‍वाचे आहे.बाईकच्या इंजिनाच्‍या दीर्घायुष्‍यासाठी सर्व्हिसिंग वेळेवर होणे खूप महत्त्‍वाचे आहे. नव्‍या बाईकवर सुरुवातीला इंजिनबरोबर त्‍याच्‍या इतर पार्ट्सवरदेखील जास्‍त दबाव पडत असतो. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 2/9

    त्यामुळे सर्व्हिसिंगची योग्य वेळ कशी ओळखायची यासाठी काही सोप्या ट्रिक्स पुढीलप्रमाणे आहेत… (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 3/9

    पहिली सर्व्हिसिंग – नवीन बाईकची पहिली सर्व्हिसिंग साधारणपणे ५००-७५० किलोमीटरनंतर किंवा पहिल्या महिन्याच्या आत करावी.(फोटो सौजन्य : @Freepik)

  • 4/9

    दुसरी आणि तिसरी सर्व्हिसिंग – सहसा २,५०० किलोमीटर आणि ५,००० किलोमीटरवर होते. ही सर्व्हिसिंग तीन ते चार महिन्यांत केली जाते. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 5/9

    याव्यतिरिक्त बाईकचा नियमित वापर केल्यानंतर तुम्ही दर ३,००० ते ५,००० किलोमीटरवर बाईक चालवल्यानंतर त्याची सर्व्हिसिंग करून घ्यावी. जर तुम्ही बाइक कमी वापरत असाल, तर दर सहा महिन्यांनी एकदा सर्व्हिसिंग करून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 6/9

    तसेच इंजिन तेल ३,००० ते ४,००० किलोमीटर अंतरावर बदलावे. कारण- ताजे तेल इंजिनाच्या अंतर्गत भागांना वंगण घालते आणि घर्षण कमी करते. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/9

    याचबरोबर प्रत्येक सर्व्हिसिंगदरम्यान एअर फिल्टर साफ केले पाहिजे किंवा बदलले पाहिजे. विशेषतः जर तुम्ही धूळ असणाऱ्या ठिकाणांहून बाइक चालवीत असाल तरी या गोष्टीची विशेष काळजी घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 8/9

    पावसाळ्यात बाईककडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारण- ओलावा, पाणी बाईकच्या इलेक्ट्रिकल्स आणि इतर भागांवर विपरीत परिणाम करू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 9/9

    सर्व्हिसिंगच्या या काळात ब्रेक, टायर व लाइट्स, साखळी आणि क्लच, स्पार्क प्लग तपासणे सुद्धा महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto Newsटिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricks

Web Title: Bike servicing tips and why your bike needs regular servicing then you must follow this tricks asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.