Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. iphone 16 series first sale in mumbai india know about features offers online side to by and many more asp

पहिल्या दिवसापासूनच iPhone 16 घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी; हजारो रुपयांची बचत करण्याची तुम्हालाही आहे संधी

iPhone 16 First Sale in India : ॲपलच्या लेटेस्ट आयफोन सीरीजचा पहिला सेल कालपासून भारतात सुरु झाला आहे…

September 21, 2024 09:00 IST
Follow Us
  • iPhone 16 first sale in India today
    1/9

    ॲपलने ९ सप्टेंबर २०२४ रोजी नवीन आयफोन १६ सिरीज लाँच केली. नवीन सीरिजमध्ये आयफोन १६ , आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या चार फोन्सचा समावेश आहे. हे चारही आयफोन्सची गेल्या आठवड्यात भारतात प्री-ऑर्डर देखील सुरु झाली आहे आणि आता डिव्हाइसेस देशात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य : Express photo / Pradip Das)

  • 2/9

    ॲपलच्या लेटेस्ट आयफोन सीरीजचा (iPhone 16) पहिला सेल कालपासून भारतात सुरु झाला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी काल सकाळपासूनच देशभरातील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य : Express photo / Pradip Das)

  • 3/9

    मुंबईच्या बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये आयफोन प्रेमींची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. तसेच आयफोन १६ सिरीजमधील नक्की कोणता फोन घ्यायचा याची चर्चा सुद्धा आपापसात करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य : Express photo / Pradip Das) (फोटो सौजन्य : Express photo / Pradip Das)

  • 4/9

    तर तुम्ही ॲपल स्टोअर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटलवरून आयफोन १६, आयफोन १६ प्लस , आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स ऑनलाइन तर दिल्ली, मुंबईतील ॲपल स्टोअर्स व देशातील इतर अधिकृत रिटेल स्टोअर्समधून ऑफलाइन खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य : Express photo / Pradip Das)

  • 5/9

    आयफोन १६ ची किंमत भारतात ७९,००० रुपये, आयफोन १६ प्रो ची किंमत १ लाख ३४ हजार ९०० रुपये, आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये, आयफोन १६ प्रो मॅक्स १,५९,००० रुपये असणार आहे. चारही मॉडेलची ही मूळ किंमत असून स्टोरेजच्या पर्यायानुसार किंमत वाढू सुद्धा शकते.(फोटो सौजन्य: Express photo / Pradip Das / @Apple )

  • 6/9

    आयफोन १६ खरेदी करणारे ग्राहक सेल दरम्यान विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून ५ हजार रुपयांपर्यंतच्या झटपट सूट शिवाय, निवडक, मोठ्या बँकांद्वारे ३ ते ६ महिन्यांसाठी विनाखर्च ईएमआय योजनांसह पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

  • 7/9

    याबरोबर Apple नवीन आयफोनवर ट्रेड-इन ऑफरही देत ​​आहे. ग्राहक जेव्हा त्यांचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करतात तेव्हा त्यांना ६७,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हे ट्रेड-इन क्रेडिट थेट नवीन आयफोन १६ च्या खरेदीसाठी लागू केले जाऊ शकते, आयफोन १६ खरेदीदारांना ॲपल म्युजिक, ॲपल टीव्ही प्लस आणि ॲपल Arcade चे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शनही देणार आहे. (फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

  • 8/9

    आयफोन १६ फीचर्स : आयफोन १६ मध्ये कस्टमाइज ॲक्शन बटन, कॅमेरा कंट्रोल बटन असणार आहे. ए १८ नवीन चीप असेल ; जी आयफोन१५ पेक्षा ३० टक्के वेगात काम करून ऊर्जेची ३० टक्के बचतसुद्धा करेल. ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले तर देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

  • 9/9

    तसेच यात iOS 18 सह Apple Intelligence (AI) सिस्टम देण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे आता iPhone 16 मॉडेल्स AAA गेम्सला सपोर्ट करतील. आणि दोन्ही मॉडेल्स यूएसबी टाईप-सी ( Type-C) पोर्ट सह येतात. आयफोन १६ मध्ये मोठी बॅटरीसह वेगवान चार्जिंग होणार आहे..आयफोन १६ मध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, नवा १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा, आजूबाजूचे अनावश्यक आवाजही व्हिडीओतून गायब होण्याची सोय यात असणार आहे. (फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)

TOPICS
आयफोनiPhoneटेकTechटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: Iphone 16 series first sale in mumbai india know about features offers online side to by and many more asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.