-
भारतीय राज्य राजस्थानला वीरांची भूमी म्हटले जाते. येथील किल्ले, संस्कृती, कला, राजवाडे यांची देशातच नव्हे तर जगात वेगळी ओळख आहे.
-
महाराणा प्रताप सिंग, महाराजा सूरज मल, राणा कुंभ, पृथ्वीराज चौहान, सवाई भोज असे अनेक वीर राजस्थानच्या मातीत जन्माला आले.
-
राजस्थान हे अनेक पर्यटन स्थळांनी भरलेले राज्य आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. पण तुम्हाला माहीत आहे का राजस्थानचे जुने नाव काय होते?
-
स्वातंत्र्यापूर्वी राजस्थानला हे नाव नव्हते. 1949 मध्ये राजस्थान भारताचा भाग होण्यापूर्वी तेथे 22 स्वतंत्र संस्थाने होती.
-
त्यावेळी जोधपूर हे राजस्थानचे सर्वात मोठे राज्य होते. राजस्थान हे नाव तिथल्या संस्कृतीवरून घेतले आहे. वास्तविक, राजस्थान म्हणजे राजांची जागा.
-
स्वातंत्र्यापूर्वी राजस्थान ‘राजपुताना’ म्हणून ओळखले जात होते. इतिहासकारांच्या मते जॉर्ज थॉमस यांनी 1800 साली राजस्थानचे नाव ‘राजपुताना’ ठेवले. जेव्हा हे नाव देण्यात आले तेव्हा राजस्थानवर राजपूत राजांचे राज्य होते त्यामुळे जॉर्ज थॉमस यांनी त्याला राजपुताना हे नाव दिले.
-
स्वातंत्र्यानंतर राजस्थानची सर्व संस्थानं भारतात विलीन झाली. संस्थानांच्या विलीनीकरणानंतर जेव्हा एकत्रित राज्यांची नावे देण्यात आली तेव्हा राजस्थान हे नाव मंजूर करण्यात आले.
-
16 जानेवारी 1949 रोजी उदयपूर येथे एका जाहीर सभेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयपूर, बिकानेर, जोधपूर आणि जैसलमेर या संस्थानांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. यानंतर, त्यांनी 30 मार्च 1949 रोजी जयपूरमध्ये एका समारंभात ग्रेटर राजस्थानचे उद्घाटन केले, त्यानंतर हा दिवस दरवर्षी राजस्थान दिवस म्हणून साजरा केला जातो.
राजस्थानचे जुने नाव काय होते हे तुम्हाला माहीत आहे का? राज्याचे नवे नाव कसे ठरले, वाचा
What was the old name of Rajasthan? : तुम्हाला राजस्थानचे जुने नाव माहित आहे का? चला याबद्दल जाणून घेऊ
Web Title: Do you know the old name of rajasthan why was this name kept spl