• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why is nsg called black cat commando india s most dangerous commandos selection process and salary spl

देशाच्या सर्वात ताकदवान ‘NSG कमांडों’ना ‘ब्लॅक कॅट कमांडो’ का म्हणतात?; NSG कमांडो कोण बनू शकतं, पगार किती मिळतो?

Why is NSG called Black Cat Commando? जगातील सर्वात ताकदवान सैन्यांमध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) कमांडोच्या नावाचाही समावेश आहे. एनएसजीला ब्लॅक कॅट कमांडोही म्हणतात. NSG कमांडो कसे बनतात आणि त्यांना पगार किती आहे?, जाणून घेऊ

Updated: October 17, 2024 17:21 IST
Follow Us
  • Why is NSG called Black Cat Commando?
    1/9

    आता राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) कमांडो व्हीआयपी सुरक्षा कर्तव्यात दिसणार नाहीत. त्यांना हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता एनएसजी कमांडोचा वापर केवळ दहशतवादविरोधी कारवायांसाठी केला जाणार आहे. तर व्हीआयपी सुरक्षेची कमान सीआरपीएफकडे असेल. सीआरपीएफची एक नवीन बटालियन तयार करण्यात आली असून तिला विशेष प्रशिक्षण देऊन व्हीआयपी सुरक्षा शाखेकडे पाठवण्यात आले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    दरम्यान, एनएसजी कमांडो कोण बनतो आणि त्यांना ब्लॅक कॅट कमांडो का म्हणतात आणि त्यांचा पगार काय आहे हे जाणून घेऊया. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    NSG कमांडो काय करू शकतो?
    एनएसजी कमांडोंचे प्रशिक्षण इतके कठोर असते की एक सैनिक डझनभर शत्रूंचा एकहाती खात्ना करू शकतो. ही देशाची सर्वोत्तम कमांडो फोर्स आहे. मारण्यासाठी आणि मरण्यासाठी सदैव तयार, एनएसजी कमांडोना दहशतवाद्यांना ठार कसे मारायचे, होस्टेजसची परिस्थिती कशी हाताळायची, गुप्त मोहिमा, सर्जिकल स्ट्राइक आणि युद्धापूर्वी हेरगिरी कशी करायची हे माहित आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    एनएसजी हा शत्रूंचा काळ आहे
    एनएसजी कमांडोला असे प्रशिक्षण दिले जाते की तो आकाश, जमीन आणि पाण्यात सर्वत्र शत्रूंना मारण्यासाठी सदैव तयार असतो. एनएसजी कमांडो बनण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रियेतून जावे लागते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    NSG कमांडो कोण बनू शकतो?
    NSG कमांडोच्या निवडीत, भारतीय सशस्त्र दल किंवा आर्मी, CRPF, BSF आणि ITBP सारख्या निमलष्करी दलाच्या सैनिकांचा समावेश केला जातो. या सैनिकांना आधीच कठोर प्रशिक्षण मिळालेले असते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    निवड कशी केली जाते?
    NSG च्या निवड प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शक्ती आणि मानसिक चाचण्यांना सामोरे जावे लागते. त्यांचे प्रशिक्षण १४ महिन्यांचे असते. या दलात १० हजारांहून अधिक कमांडो आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    विशेष प्रशिक्षण
    निवडलेल्या उमेदवारांना अतिशय कठोर प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणामध्ये अत्याधुनिक शस्त्रे वापरणे, बंदूक हाताळणे, स्फोटकांचे ज्ञान आणि शारीरिक क्षमता वाढवणे यांचा समावेश होतो. एनएसजी कमांडोला दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यासाठी, ओलिसांची सुटका करण्यासाठी आणि उच्च प्रोफाइल सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    याला ब्लॅक कॅट कमांडो का म्हणतात?
    वास्तविक, ते काळा गणवेश आणि हेल्मेट घालतात ज्यामुळे त्यांची ओळख सर्वांपासून लपलेली असते. त्यांचे प्रतीक देखील एक काळी मांजर आहे जी त्यांच्या गती आणि चपळतेचे प्रतीक आहे. या कारणास्तव त्यांना ब्लॅक कॅट कमांडो म्हणतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    NSG कमांडोंचा पगार किती?
    NSG कमांडोला चांगल्या पगारासोबत अनेक सुविधाही मिळतात. एका अहवालानुसार, प्रशिक्षणादरम्यान त्यांना दरमहा १८ हजार रुपये स्टायपेंड मिळतो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, एनएसजी कमांडोचा पगार दरमहा 40,000 ते 85,000 रुपयांपर्यंत असतो. यासोबतच त्यांना प्रवास भत्ता, महागाई भत्ता, मोफत रेशन, सरकारी निवास, मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन यांसारखे अनेक भत्ते आणि सुविधाही मिळतात. (फोटो: इंडियन एक्स्प्रेस)
    हेही पाहा- कॅनडामधील सर्वात धनाढ्य भारतीय; रिअल इस्टेटचा ‘किंग’ अशी ओळख, वाचा मालमत्तेची माहिती

TOPICS
ट्रेंडिंगTrendingभारतीय सैनिकभारतीय सैन्यदलIndian |Armyमराठी बातम्याMarathi News

Web Title: Why is nsg called black cat commando india s most dangerous commandos selection process and salary spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.