• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. golden temple illuminated for guru nanak 555th birth anniversary millions gather on prakash parv spl

Photos : गुरू नानक जयंतीनिमित्त अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात उसळली भाविकांची गर्दी, Golden Temple चे आकर्षक फोटो व्हायरल

Guru Nanak Jayanti celebrations: गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात प्रकाश पर्वाचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गुरु नानक जयंतीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक भक्तीभावाने येथे जातात.

Updated: November 15, 2024 13:12 IST
Follow Us
  • Illuminated Golden Temple on Guru Nanak Jayanti
    1/9

    आज गुरु नानक यांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. गुरू नानक जयंतीला, गुरु पर्व किंवा गुरु नानक प्रकाश उत्सव असेही म्हणतात. शीख धर्माचे पहिले गुरू गुरु नानक देवजी यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी देशभरातील गुरुद्वारांमध्ये विशेष वैभव पाहायला मिळते. (पीटीआय फोटो)

  • 2/9

    पंजाबमधील अमृतसर येथे असलेले प्रसिद्ध सुवर्ण मंदिर या दिवशी विशेष आकर्षणाचे केंद्र असते. या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाची खास गोष्ट म्हणजे मंदिराचा वरचा भाग सोन्याचा आहे, त्यामुळे याला सुवर्ण मंदिर म्हणतात. (पीटीआय फोटो)

  • 3/9

    सुवर्ण मंदिराच्या प्रांगणात एक मोठा तलाव देखील आहे, जो पवित्र मानला जातो. येथे भाविक स्नान करतात आणि या तलावात स्नान केल्याने पापांचा नाश होऊन मनःशांती मिळते अशी श्रद्धा आहे. (पीटीआय फोटो)

  • 4/9

    गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वानिमित्त नगर कीर्तनाचेही आयोजन केले जाते. यानिमित्ताने अमृतसरमध्ये विशेषत: शीख भाविक आणि विविध समुदायांचे लोक एकत्र येतात आणि भव्य नगर कीर्तनात सहभागी होतात. या वेळी भक्त भजन-कीर्तन करतात आणि गुरु नानक देवजींच्या शिकवणीचे स्मरण करतात. (पीटीआय फोटो)

  • 5/9

    गुरु नानक देव जी यांचे जीवन आणि शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि समता, सेवा, सत्य आणि समर्पणाचा संदेश दिला. सर्वांसाठी प्रेम, भेदभाव न करता सेवा आणि ईश्वरावरील अपार भक्तीचा संदेश त्यांच्या शिकवणीत आहे. (पीटीआय फोटो)

  • 6/9

    प्रकाश पर्वाच्या पूर्वसंध्येला सुवर्णमंदिराची सजावट करण्यात आली आहे. जेव्हा सूर्यास्त होतो आणि अंधार पडतो तेव्हा सुवर्ण मंदिराचे रोषणाईतील एक अनोखे दृश्य पाहायला मिळते. हे भव्य दृश्य पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. (पीटीआय फोटो)

  • 7/9

    संपूर्ण इमारत दिव्यांनी चमकते आणि तिचे सौंदर्य आजूबाजूच्या लोकांना आकर्षित करते. अमृतसरशिवाय देशभरातील गुरुद्वारांनाही सजावट करण्यात आली आहे. अमृतसर व्यतिरिक्त पाटणा, मुरादाबाद आणि भारतातील इतर शहरांमध्येही भक्त नगर कीर्तनात सहभागी होत असतात. या मिरवणुकीत लहान मुले, महिला व वृद्ध देखील पूर्ण भक्तीभावाने सहभागी झाले आहेत. (पीटीआय फोटो)

  • 8/9

    अमृतसर व्यतिरिक्त पाटणा, मुरादाबाद आणि भारतातील इतर शहरांमध्येही भक्त नगर कीर्तनात सहभागी होत असतात. या मिरवणुकीत लहान मुले, महिला व वृद्ध देखील पूर्ण भक्तीभावाने सहभागी झाले आहेत. (Photo: Indian Express)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : ब्रिटीश पद्दतीने लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने बंगाली रितीरिवाजानुसार पुन्हा बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Golden temple illuminated for guru nanak 555th birth anniversary millions gather on prakash parv spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.