-
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या तोफा डागल्या जात आहेत. (Photo: Kailash Vijayvargiy/facebook)
-
राजकीय पक्षांनी स्टार प्रचारक आणि निवडणूक प्रभारी यांच्यासह कलाकारही प्रचारात उतरवले आहेत. (Photo: Kailash Vijayvargiy/facebook)
-
अशातच आता सोशल मीडियावरून प्रसिद्धीझोतात आलेल्या डॉली चायवालाने भाजपाच्या वतीने प्रचारात उडी घेतली आहे. (Photo: Kailash Vijayvargiy/facebook)
-
डॉली चायवाला गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडिया सेंसेशन बनलेला आहे.
-
दरम्यान नागपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत डॉली चायवाला दिसून आला. डॉलीबरोबरचे फोटो भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (Photo: Kailash Vijayvargiy/facebook)
-
त्यामुळं डॉली पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी आला आहे.
-
डॉली आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजात चहा विकण्याच्या स्टाईलमुळे लोकप्रिय आहे.
-
. त्याच्यासोबत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या बिल गेट्स यांनी सुद्धा फोटोशूट केले आहे.
-
दरम्यान, डॉली आता राजकरणात प्रवेश करणार का अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
असं असलं तरी डॉलीने त्याच्या राजकारणातील घडामोडीवर कोणतेही भाष्य सध्या तरी केलेले नाही.
-
(सर्व फोटो साभार- Dolly Ki Tapri Nagpur/Instagram)
देश-विदेशात लोकप्रियता मिळवलेला ‘डॉली चायवाला’ आता राजकारणात? भाजपाच्या प्रचारात दिसल्याने चर्चांना उधाण, पाहा नेमकं काय घडलं
Dolly Chaiwala : डॉली चायवाला गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडिया सेंसेशन बनलेला आहे. दरम्यान नागपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत डॉली चायवाला दिसून आला.
Web Title: Dolly chaiwala entry in poltics campaign for bjp candidates at nagpur photos viral maharashtra assembly elections spl