-
फोटो शेअरिंग, मेसेजिंग व व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल, रील आदी फीचर्सचा ऑफर करणारे इन्स्टाग्राम ॲप तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
तुमचे अकाउंट खासगी असो किंवा पब्लिक तुमचे अकाउंट पाहणारे सर्व युजर्स चांगले नसतात. काही जणांकडून वाईट हेतूने या ॲपचा वापर केला जाऊ शकतो. काही लोक तुमच्या फॉलोअर्सच्या यादीत नसतात. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
पण तरीही ते प्रोफाईल शोधून, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये काय पोस्ट करताय याचे निरीक्षण करू लागतात आणि तुमच्या प्रायव्हसीला हानी पोहोचवू शकतात.त्यामुळे प्रायव्हसी (गोपनीयता) राखण्यासाठी तुमचे प्रोफाईल स्टॉकर्सपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
ही बाब लक्षात घेऊन, इन्स्टाग्राम तुमचे प्रोफाइल कोण स्टॉक करत आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला एक सेटिंग ऑफर करीत आहे. तुमचे खाते सुरक्षित कसे करायचे ते चला पाहू… इन्स्टाग्राम स्टॉकर्सला शोधण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी पायऱ्या… (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
१. इन्स्टाग्राम ॲप उघडा – प्रोफाईल चिन्हावर टॅप करून, तुमच्या प्रोफाईलवर जा. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
२. ॲक्सेस सेटिंग्ज – उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन रेषांवर (हॅम्बर्गर मेन्यूवर) क्लिक करा आणि ‘Blocked’ विभागात जा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. सजेशन एक्सप्लोर करा – ब्लॉक यादी खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला “You May Want to Block” असे लेबल असलेला पर्याय दिसेल.(फोटो सौजन्य: @Pixabay)
-
४. आयडेंटिफाय स्टॉकर (Identify stalkers)- हा विभाग तुमच्या प्रोफाईलला वारंवार भेट दिलेल्या लोकांची यादी तयार करतो. जर तुम्हाला या यादीमध्ये कोणी संशयास्पद दिसले, तर तुम्ही तुमच्या प्रायव्हसीचे संरक्षण करण्यासाठी त्यांना त्वरित ब्लॉक करू शकता. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
मेटा-मालकीचे इन्स्टाग्राम आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रायव्हसी (गोपनीयता) फीचर्स प्रदान करतो. या सेटिंग्जचा वापर करून, तुम्ही अनोळखी व्यक्ती किंवा स्टॉकर्स तुमच्या प्रोफाईलचा गैरवापर करीत नाही ना हे ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या ॲपची मदत घेण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य: @Pixabay)
तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट कोण करतंय स्टॉक? ‘या’ सोप्या ट्रिकनं शोधा आणि मिनिटांत करा त्याला ब्लॉक
how to Block Instagram Stalkers: तुमचे अकाउंट खासगी असो किंवा पब्लिक तुमचे अकाउंट पाहणारे सर्व युजर्स चांगले नसतात. काही जणांकडून वाईट हेतूने या ॲपचा वापर केला जाऊ शकतो. काही लोक तुमच्या फॉलोअर्सच्या यादीत नसतात…
Web Title: Keeping your profile safe from stalkers then follow this easy steps asp