• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. what is hmpv how dangerous is this virus and what are its symptoms spl

HMPV म्हणजे काय? हा विषाणू किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत?

What is HMPV virus, causes and symptoms: सध्या, HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरस चीनमध्ये कहर करत आहे. भारतातही त्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. हा विषाणू किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत.? जाणून घेऊ.

Updated: January 6, 2025 16:27 IST
Follow Us
  • How HMPV Virus Affects China
    1/11

    कोरोना विषाणूने चीनसह जगभरात प्रचंड गोंधळ निर्माण केला होता. अजूनही तो पूर्णपणे संपला नसताना आता आणखी एक विषाणू पसरू लागला आहे, ज्याचा सर्वाधिक उद्रेक चीनमध्येच दिसून येत आहे. (फोटो: पेक्सेल्स)

  • 2/11

    वास्तविक, सध्या चीनमध्ये HMPV (Human Metapneumovirus) व्हायरसने कहर केला आहे. चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे. परिस्थिती अशी आहे की चीनच्या रुग्णालयांमध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. (Photo: Social Media) 

  • 3/11

    भारतातील पहिले प्रकरण
    चीनच्या उत्तरेकडील भागात HMPV (Human Metapneumovirus) विषाणू वेगाने पसरत आहे. अधिकाधिक लहान मुलं याला बळी पडत आहेत. भारतातही एचएमपीव्ही विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. बंगळुरूमध्ये एका ८ महिन्यांच्या मुलीला या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. चला जाणून घेऊया हा विषाणू काय आहे, त्याची लक्षणे आणि तो किती धोकादायक आहे? (Photo: Social Media) 

  • 4/11

    चीनच्या रुग्णालयांमध्ये गर्दी
    सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूने किती कहर केला आहे हे लक्षात येऊ शकते. इतके लोक या विषाणूला बळी पडले आहेत की रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी बेड्,चा तुटवडा आहे. independent.co.uk वेबसाइटनुसार, चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी काही प्रोटोकॉल लागू केले आहेत. मात्र, याबाबत कोणतीही आपातकालीन स्थिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. (Photo: Social Media) 

  • 5/11

    सतर्क राहण्याची आवश्यकता का आहे?
    हा विषाणू देखील भयावह आहे कारण ५ वर्षांपूर्वी, कोविडच्या सुरूवातीस अशीच प्रकरणे नोंदवली गेली होती आणि त्यानंतर त्याने संपूर्ण जगाला वेढले होते. सध्या चीनमध्ये लाखो लोकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली असून रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीही सातत्याने वाढत आहे. (Photo: Pexels)

  • 6/11

    HMPV व्हायरस म्हणजे काय आणि तो किती धोकादायक आहे?
    independent.co.uk वेबसाइटनुसार, Human metapneumovirus (HMPV) हा RNA व्हायरस आहे जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. या विषाणूमुळे श्वसन संक्रमण होते ज्याची लक्षणे सहसा सर्दीसारखी असतात. हा रोग सामान्यतः सौम्य असतो, परंतु यामुळे न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Photo: Pexels)

  • 7/11

    कोणत्या वयोगटातील लोकांना जास्त धोका?
    ब्रिटिश वेबसाइट independent.co.uk नुसार, लहान मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना HMPV विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. (Photo: Pexels)

  • 8/11

    हा व्हायरस किती जुना आहे?
    मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा नवीन विषाणू नाही. याची ओळख २३ वर्षांपूर्वी २००१ मध्ये झाली होती. तथापि काही शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की हा विषाणू किमान १९५८ मध्येही पसरला होता. त्यानंतरही त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही किंवा त्यावर फारसे संशोधनही झाले नाही. (Photo: Pexels)

  • 9/11

    या काळात अधिक धोका
    independent.co.uk च्या मते, HMPV विषाणू खोकला आणि शिंकणे यातूनही पसरतो. याशिवाय हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही पसरू शकतो. त्याचा प्रभाव तीन ते पाच दिवस राहतो. हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. (Photo: Pexels)

  • 10/11

    प्रसार कसा होतो?
    my.clevelandclinic.org वेबसाइटनुसार, खोकणे आणि शिंकणे याशिवाय, HMPV विषाणू संक्रमित व्यक्तीला हस्तांदोलन, मिठी मारणे आणि चुंबन घेण्याद्वारे देखील पसरतो. यासोबतच एखाद्या संक्रमित व्यक्तीने दरवाजाच्या हँडल, कीबोर्ड किंवा खेळण्यांना हात लावला तरही संसर्ग पसरू शकतो. (Photo: Pexels)

  • 11/11

    एचएमपीव्ही विषाणूची लक्षणं
    my.clevelandclinic.org वेबसाइटनुसार, HMPV विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये खोकला, ताप, सर्दी, घसा खवखवणे, अस्वस्थता आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे दिसतात. (Photo: Pexels) हेही पाहा- धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: What is hmpv how dangerous is this virus and what are its symptoms spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.