Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. israel iran conflict america formally enters in war donald trump calls for iran s unconditional surrender calls khamenei easy target spl

इराण- इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; अयातुल्लाह खोमेनींना इशारा देत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान! नेमकं काय घडतंय?

Israel iran conflict latest updates: इस्रायलने इराणच्या आण्विक आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता.

Updated: June 18, 2025 12:27 IST
Follow Us
  • donald trump warns tehran ali hosseini khamenei
    1/9

    Israel Iran Attacks Update: गेल्या ६ दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. (Photo: AP)

  • 2/9

    इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल आहेत, तर इराणनेही इस्रायलला प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले आहेत. इराण व इस्रायलनं एकमेकांच्या राजधानीच्या शहरांना लक्ष्य केलं आहे. यामध्ये दोन्ही देशांमध्ये मोठी जीवितहानी होत आहे. (Photo: AP)

  • 3/9

    दरम्यान, इस्रायलने इराणच्या आण्विक आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. इस्रायल आणि झायोनिस्ट राजवटीचा अंत जवळ आल्याचा इशारा त्यांनी दिला. (Photo: Reuters)

  • 4/9

    मध्यरात्री इराणकडून इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ले
    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी ‘आता लढाई सुरू’ अशा आशयाची पोस्ट केल्यानंतर इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणवार ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. खुद्द इस्रायलच्या लष्करानं यासंदर्भातली माहिती दिली असून इराणकडून क्षेपणास्त्र डागली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या उत्तरेकडील भागात व हैफा भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे.

  • 5/9

    दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर करत इराणला जाहीर इशारे दिले आहेत. (Photo: Reuters)

  • 6/9

    काल १७ जून रोजी तर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणचे सर्वोच्च नेते अली हुसेनी खोमेनी यांना ठार करण्यासंदर्भातही विधान केलं आहे. (Photo: Reuters)

  • 7/9

    नेमकं काय म्हणाले ट्रम्प?
     “आम्हाला माहित आहे की तथाकथित सर्वोच्च नेते (इराणचे सर्वोच्च नेते) कुठे लपले हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. ते सोपे टार्गेट आहेत, पण ते तिथे सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढणार नाहीत (मारणार नाही!)किमान सध्या तरी नाही.पण आम्हाला नागरिकांवर किंवा सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. पण आमचा संयम सुटत चालला आहे”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. (Photo: Reuters)

  • 8/9

    इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “आता आमचं इराणवरील आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे. इराणकडे चांगले स्काय ट्रॅकर्स आणि इतर संरक्षणात्मक उपकरणे भरपूर होती. पण त्याची तुलना अमेरिकेने निर्माण केलेल्या गोष्टींशी होऊ शकत नाही. अमेरिकेपेक्षा हे कोणीही चांगलं करू शकत नाही,”  अमेरिकेने इराणच्या संपूर्ण शरणागतीची मागणी केली आहे. (Photo: Reuters)

  • 9/9

    (Photo: AP) हेही पाहा- PM Modi Canada Visit G7 Summit 2025: जी-७ शिखर परिषदेसाठी पीएम मोदी कॅनडामध्ये दाखल; पंतप्रधानांच्या ‘या’ दौऱ्याचे महत्व काय?

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational NewsइराणIronइस्रायलIsraelडोनाल्ड ट्रम्पDonald Trump

Web Title: Israel iran conflict america formally enters in war donald trump calls for iran s unconditional surrender calls khamenei easy target spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.