-
इराण इस्रायल संघर्ष
गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व इराण यांच्यात चालू असलेला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. एकीकडे इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले होत असताना इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. (Photo: AP) -
इराणचा संपूर्ण आण्विक कार्यक्रमच नष्ट करण्याच्या उंबरठ्यावर आपण असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. (Photo: AP)
-
तर इस्रायलची अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणाली जी याआधीही चर्चेत राहिलेली आहे, ती म्हणजे आयर्न डोम. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
या प्रणालीचा सामना करण्यासाठी नवे तंत्र वापरल्याचा दावा इराणने केला आहे, त्यामुळे आता या प्रणालीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, चला जाणून घेऊयात आयर्न डोम सिस्टमबद्दल… (Photo: AP)
-
काय आहे आयर्न डोम?
ही एक शॉर्ट रेंज, ग्राउंड-टू-एयर, एअर डिफेन्स सिस्टम आहे ज्यात एक रडार आणि तामिर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याचा वापर रॉकेट, तोफ (सी-रॅम) तसेच विमान, हेलिकॉप्टरचा प्रतिकार करण्यासाठी केला जातो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
आयर्न डोम २०११ मध्ये कार्यान्वित करण्यात आलं होतं. राफेलने आयर्न डोम हे ९० टक्के तर इतर तज्ञांनी हे ८० टक्के यशस्वी असल्याचे मान्य केलं आहे. “हवाई हल्ल्यांपासून तसेच युद्धाच्या भूमीवर आणि शहरी भागांत देखील यापासून संरक्षण केले जाऊ शकते”, असे राफेलने आपल्या संकेतस्थळावर असे म्हटले आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
आयर्न डोममध्ये तीन मुख्य सिस्टीम आहेत. ज्या तैनात करण्यात आलेल्या धोक्यांपासून वाचण्यासाठी जागेवर कवच निर्माण करतात. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
यामध्ये व्हेपन कंन्ट्रोल सिस्टिम (बीएमसी) आणि मिसाईल फायरिंग युनिट, ट्रॅकिंग रडार आहे. बीएमसी मुळात रडार आणि इंटरसेप्टर रॉकेट दरम्यान संपर्क साधतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये या यंत्रणेचा वापर करता येतो. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
किती आहे किंमत?
पूर्ण युनिटची किंमत ५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. त्यातील एका इंटरसेप्टर तामीर रॉकेटची किंमत ८० हजार डॉलर आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) -
याउलट यंत्रणेकरून निकामी करण्यात येणाऱ्या रॉकेटची किंमत ही १००० डॉलरपेक्षाही कमी असते. प्रत्येक आयर्न डोममध्ये दोन तामीर रॉकेट बसवण्यात आली आहेत. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels)
-
(प्रतिकात्मक फोटो, सौजन्य- Pexels) हेही पाहा- इराण- इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; अयातुल्लाह खोमेनींना इशारा देत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान! नेमकं काय घडतंय?
Israel Iran Conflict : हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करणारं इस्त्रायलचं ‘आयर्न डोम’ नेमकं कसं काम करतं?
Israel Iran Attacks Update : रॉकेट हल्ल्यांना रोखण्यासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे ही यंत्रणा काम करते…
Web Title: Israel iran war what is israels iron dome air defence system know full details spl