• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. love story of france president emmanuel macron and his former teacher brigitte macron spl

१५ व्या वर्षी ३९ वर्षीय शिक्षिकेच्या प्रेमात; कालांतराने तिच्याशीच केले लग्न, चित्रपटालाही लाजवेल अशी आहे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची प्रेमकथा…

इमॅन्युएल यांचे प्रेम सुरू झाले त्यावेळी ते १५ वर्षांचे होते. तर ब्रिगिट या ३९ वर्षांच्या होत्या.

June 24, 2025 12:44 IST
Follow Us
  • Extraordinary Romance of Emmanuel Macron and His Teacher
    1/12

    फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिगिट ट्रोग्नियू यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्यांची कहाणी १९९३ मध्ये फ्रान्समधील अमिएन्स शहरात सुरू झाली, जेव्हा मॅक्रॉन फक्त १५ वर्षांचे होते आणि ब्रिगिट ३९ वर्षांच्या होत्या. त्या शाळेत शिक्षिका होत्या. (Photo: @emmanueletbrigittemacron/instagram)

  • 2/12

    मनोरंजक गोष्ट म्हणजे, ब्रिगिट यांची मुलगी इमॅन्युएलची वर्गमित्र होती. त्यावेळी ब्रिगिट तीन मुलांच्या आई होत्या आणि त्यांचे आधीच लग्न झाले होते. (Photo: @emmanueletbrigittemacron/instagram)

  • 3/12

    एके दिवशी, ‘द आर्ट ऑफ कॉमेडी’ या शालेय नाटकावर चर्चा करत असताना, इमॅन्युएल यांनी ब्रिगिट यांना मदत मागितली आणि दोघांमधील भेटीगाठी वाढल्या. कालांतराने, त्यांच्यातील आकर्षण वाढत गेले आणि एक नाते निर्माण झाले. (Photo: @emmanueletbrigittemacron/instagram)

  • 4/12

    ३९ वर्षीय महिला शिक्षिका आणि १५ वर्षीय विद्यार्थ्यामधले प्रेम संबंध संपूर्ण शाळेत आणि कुटुंबात एक चर्चेचा विषय बनले होते. इमॅन्युएल यांचे पालक या नात्याला तीव्र विरोध करत होते. सुरुवातीला त्यांना वाटले की तो ब्रिगिटच्या मुलीला म्हणजे त्याच्या वर्गमैत्रिणीला डेट करत आहे. (Photo: @emmanueletbrigittemacron/instagram)

  • 5/12

    जेव्हा इमॅन्युएलच्या वडिलांना सत्य कळले तेव्हा त्यांना धक्का बसला. यानंतर, त्यांनी आपल्या मुलाला ब्रिगिटपासून दूर ठेवण्यासाठी पॅरिसला पाठवले. पण पॅरिसला जाण्यापूर्वी, इमॅन्युएलने ब्रिगिटला सांगितले – “काहीही झाले तरी मी तुझ्याशीच लग्न करेन.” (Express Photo)

  • 6/12

    मी माझे वचन पाळले, मला समाजाची पर्वा नव्हती.
    काळ पुढे सरकला, ब्रिगिटने २००६ मध्ये तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि २००७ मध्ये इमॅन्युएल मॅक्रॉनशी लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल २९ वर्षांचे होते आणि ब्रिजिट्ट ५४ वर्षांच्या होत्या. (Express Photo)

  • 7/12

    ब्रिगिट यांचे लग्न ज्या ठिकाणी झाले होते त्याच ठिकाणी या दोघांचेीही लग्न झाले. ब्रिगिट यांची तीन मुलेही लग्नाला उपस्थित होती, ज्यांच्या संमतीने हे लग्न झाले. (Express Photo)

  • 8/12

    लोकांनी कसे स्वीकारले?
    सुरुवातीला या नात्यावर बरीच टीका झाली. वयातील फरक, शिक्षक-विद्यार्थी नाते आणि ब्रिगिटचे कुटुंब – सर्वकाही चर्चेचा विषय बनले. (Express Photo)

  • 9/12

    पण कालांतराने फ्रान्सच्या लोकांनी हे नाते स्वीकारले आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांना त्यांचे अध्यक्ष म्हणून निवडले. (Photo: AP/PTI)

  • 10/12

    ब्रिगिट केवळ त्यांची पत्नीच बनल्या नाही तर त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाच्या रणनीतीकारही ठरल्या. आजही त्या राष्ट्रपतींना खाजगी आणि सार्वजनिक जीवनात एक मजबूत सल्लागार म्हणून काम करतात. (Express Photo)

  • 11/12

    एक अतुलनीय प्रेम आणि भक्ती
    इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिगिट यांच्या नात्यावरून हे सिद्ध होते की खरे प्रेम वय पाहत नाही. सामाजिक नियमांचे बंधन असताना, एकमेकांप्रती निष्ठा आणि समर्पण असेल तर काहीही शक्य होते. (Photo: AP)

  • 12/12

    आज, हे जोडपे फ्रान्समधील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली जोडप्यांपैकी एक आहे. ब्रिगिट सध्या ७२ वर्षांच्या आहेत. तर इमॅन्युएल यांचं वय ४७ आहे. (Express Photo) हेही पाहा- होर्मुझ सामुद्रधुनी आतापर्यंत किती वेळा बंद करण्यात आली आहे? इराणच्या या निर्णयाचा जगावर कसा होणार परिणाम?

TOPICS
ट्रेंडिंगTrendingफ्रान्सFrance

Web Title: Love story of france president emmanuel macron and his former teacher brigitte macron spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.