-
आषाढ (Aashadh Month) महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या (Deep Amavasya) असे म्हणतात.
-
श्रावणाचा (Shravan Month) पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या (Amavasya) येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते.
-
दीप अमावस्येच्या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समया, निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात.
-
दिवे चकचकीत करुन पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते.
-
पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करुन सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करुन ही दीप पूजा केली जाते.
-
काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करुन त्यांचीही पूजा केली जाते.
-
हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते.
-
अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात.
-
सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते.
-
अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते. (Photo Credit: Unsplash)
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी?
श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते.
Web Title: Gatari ashadha deep amavasya 2025 know in detail about deep diya pooja at home sdn