-   राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू युगेंद्र पवार यांचा ३ ऑगस्ट रोजी तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत मुंबईत साखरपुडा पार पडला. 
-  या साखरपुडा समारंभात तनिष्का कुलकर्णी यांनी परिधान केलेली गुलाबी रंगाची पारंपरिक बनारसी साडी लक्षवेधी ठरली. 
-  साडीवर सोनसळी आणि रुपेरी भरझरी काम, तसेच छोट्या-छोट्या बुट्यांनी सजवलेला बारीक नक्षीकामाचा भरजरी पोत साडीला खास उठाव देतो. 
-  तनिष्का कुलकर्णी यांच्या सौंदर्यप्रसाधनात दिलेला ऐवज खूप सूक्ष्म होता. 
-  केस मोकळे ठेवून सॉफ्ट कलर्स दिले गेले असून, चेहऱ्यावर अत्यंत हलकासा मेकअप, पीच ब्लश, नाजूक गुलाबी लिपस्टिक आणि टोकदार आयलाइनरचा वापर करण्यात आला आहे. 
-  कपाळावरच्या छोटीश्या गुलाबी टिकलीमुळे त्या खूपच सुंदर दिसत आहेत. 
-  तनिष्का कुलकर्णी यांचा लूक सोज्वळ आणि आकर्षक वाटतो. 
-  (सर्व फोटो सौजन्य : makeupbyaanchal/इन्स्टाग्राम) 
Photos: गुलाबी बनारसी साडीत खुललं युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचं सौंदर्य
पारंपरिक बनारसी साडीत युगेंद्र पवार यांची पत्नी तनिष्का कुलकर्णीचा सोज्वळ लूक
Web Title: Political leader yugendra pawar fiancee tanishka kulkarni beauty in pink banarasi saree svk 05