-
हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला (Pithori Amavasya) विशेष महत्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या, भादो अमावस्या व कुश ग्रहणी अमावस्या असे म्हणतात.
-
पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखासाठी उपवास व पूजा करतात.
-
या दिवशी माता पार्वती व अष्टमातृकांची पूजा केली जाते.
-
‘पिठोरी’ हा शब्द ‘पीठ’ या शब्दावरून आला आहे. या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते.
-
पिठाचे हत्ती, घोडे, बैल, मनुष्य, देवतांचे प्रतीक इत्यादी बनवून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो.
-
सकाळी स्नान करून व्रतधारक स्त्रिया उपवास करतात.
-
दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केले जाते.
-
मुलांना व कुटुंबाला संकटांपासून रक्षण मिळावे, अशी माता प्रार्थना करतात.
-
पिठोरी अमावस्या केल्याने संततीचे रक्षण होते असे मानले जाते.
-
या अमावस्येला पितर तृप्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, दान करण्याचीही प्रथा आहे.
-
या दिवशी दानधर्म व पितृकार्य करणे विशेष फलदायी मानले जाते.
-
पंचांगानुसार, पिठोरी अमावस्या २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:५५ वाजता सुरू होऊन २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३५ वाजता संपेल. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
Pithori Amavasya 2025: यंदा पिठोरी अमावस्या कधी? या दिवशी नक्की काय करतात?
या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते.
Web Title: Pithori amavasya 2025 date time what exactly women do on this day for kids pooja vidhi honouring ancestors sdn